Pimpri : नवरात्रोत्सावात दांडिया भरवणे गृहसंस्थेच्या पदाधिकार्‍यांना पडलं महागात

आळंदी : पोलीसनामा ऑनलाईन –   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवात (navratra-festival) गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी असतानाही गृहसंस्थेत गरबा भरवणे आयोजकांना चांगलेच महागात पडले. या प्रकरणी आळंदी येथील जलाराम हाऊसिंग सोसायटीच्या तिघां पदाधिका-या विरोधात (housing-society-members-crime-registred) आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गृहसंस्थेचे प्रभारी सचिव आणि सांस्कृतिक कार्यक्रम पदाधिकारी प्रफुल्ल दत्तात्रय माळवदे, अध्यक्ष प्रताप वैजू शेवाळकर, उपाध्यक्ष महादेव पाटील अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पदाधिका-यांची नावे आहेत. नवरात्र काळात गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम भरवण्यास मनाई आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी जमावबंदी लागू केली आहे.असे असतानाही आळंदी येथील जलाराम हाऊसिंग सोसायटीत 20 ऑक्टोंबरला रात्री नऊ ते दहा या वेळेत 15 ते 20 महिला व पुरुष दांडिया खेळत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी मच्छिंद्र शेंडे यांनी फिर्याद दिली आहे.