FILM 83 : एकत्र दिसून आली पूर्ण भारतीय टीम, अशा अवतारात दिसला रणवीर सिंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याचा आगामी सिनेमा 83 च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेामत तो खूप कष्ट घेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो क्रिकेटच्या मैदानात घाम घाळताना दिसत आहे. नुकतेच सिनेमातील स्टार कास्ट गेल्या अनेक दिवसांपासून हिमाचल प्रदेशच्या धर्मशालामध्ये क्रिकेटचे बारकावे शिकताना दिसून आले होते. बॉलिवूड रिपोर्ट्सनुसार, हे स्टार कास्ट आता बॉलिवूडच्या धुरंधर सिनेमाच्या शुटींगच्या पहिल्या शेड्युलसाठी इंग्लंडला रवाना झाली आहे.

नुकतेच रणवीरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पहिल्या उड्डाणाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दिसत आहे की, सगळे कलाकार एकाच अवतारात आहेत. या पूर्ण टीमने एअरपोर्टवर फोटोशुटही केलं होतं. या फोटोत पूर्ण टीम ब्लॅक कलरच्या सूटमध्ये दिसत आहे. खास बात तुम्हाला सांगू इच्छितो ती म्हणजे अशी की, सर्व कलाकार खूपच टेंशनमध्ये दिसत आहे. याशिवाय अभिनेता रणवीर सिंग फोटोत बरोबर मध्यभागी उभा असल्याचे दिसत आहे.

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सिनेमाशी संबंधित फोटो शेअर करण्याची रणवीरची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही रणवीर सिंग कपिल देव सोबत दिसला आहे. नुकतेच त्याने कपिल देव यांच्याकडून ट्रेनिंग घेतानाचे काही फोटो शेअर केले होते. या सिनेमाचा फर्स्ट लुक आणि या सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात रणवीर सिंगसोबत हार्डी संधू, साकिब सलीम, पंकज त्रिपाठी आदी सर्वत प्रमुख भूमिकेत आहेत.