‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’च्या दिग्दर्शकाला अटक, ऑर्थर रोड जेलमध्ये रवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

माजी पंत्रप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जिवनावर अधारीत असलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक करण्यात आली आहे. दिग्दर्शक विजय गुट्टेवर ३४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला असून त्याच्यावर यापूर्वी १७० कोटींचा घोटाळ्याचा आरोप आहे. विजय गुट्टेला जीएसटी इंटेलिजन्सने मुंबईतून अटक करुन त्याची रवानगी ऑर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विजय गुट्टे याच्या मालकीची व्हीआरजी डिजिटल कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीने ३४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी बिलांमध्ये फेरफार करुन घोटाळा केला असल्याचे समजते. व्हीआरजी या कंपनीने अॅनिमेशन आणि इतर कामासाठीची बिले दुसऱ्या एका कंपनीची दाखवली आहेत. ही बिले खोटी असल्याचा आरोप गुट्टेवर आहे. ज्या कंपनीकडून ही बिले घेण्यात आली आहेत त्यांच्यावर यापूर्वी १७० कोटींचा घोटाळ्याचा आरोप आहे.

[amazon_link asins=’B00KCKEYPU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’565e5b31-971d-11e8-9629-1dcb3055b60e’]

दिग्दर्शक विजय गुट्टेला केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या 132(1)(सी) नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये अनुपम खेर यांनी मनमोहन सिंग यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.