सिनेतारकांची डोपिंग चाचणी घ्यावी : सारंग यांची मागणी

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाइन  –   “जशी खेळाडूंची डोपिंग चाचणी घेतात, त्याचप्रमाणे पद्धतीने चित्रपटसृष्टीतील अभिनेते- अभिनेत्रीदेखील डोपिंग चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी मध्य प्रदेशातील वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी केली आहे. ही मागणी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून करणयात आली आहे.

सारंग यांनी पत्रामध्ये असे लिहिले आहे की, सध्या चित्रपट अभिनेते हे युवकांचे आयकॉन बनत चालले आहेत. आवडत्या चित्रपट कलाकारांची स्टाइल, ड्रेस इत्यादींचे अनुकरणच करतात. तसेच त्यांच्यासारखीच जीवन पद्धतीदेखील स्वीकारत आहेत. वर्तमानपत्रांतून चित्रपट कलाकारांच्या ड्रग पार्ट्यांबाबत अनेक बातम्या छापून येत असतात. चित्रपट कलाकारांमध्ये ड्रगचा वापर वाढल्यामुळे त्याचा तरुणांवर वाईट परिणाम होत आहे, त्यातूनच ड्रग्सकडे आकर्षित होत आहेत, असा मजकूर पत्रात लिहिले आहे.

खेळाडूंमधील ड्रग घेण्याचा प्रकार रोखण्यासाठी कोणत्याही खेळाडूंची डोपिंग चाचणी घेतली जाण्याची शक्यता असते. यासाठी संबंधित फेडरेशनला त्याची जबाबदारीही देण्यात आली आहे. खेळाडूंची डोपिंग चाचणी जागतिक डोपिंग विरोधी संस्था World Anti-Doping Agency किंवा राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेद्वारे The National Anti-Doping Agency केली जाते. एखाद्या स्पर्धेच्या अगोदर किंवा प्रशिक्षण शिबिराच्या वेळी नेहमीच डोपिंग चाचणी केली जाते. याच जर एखादा खेळाडू दोषी आढळल्यास त्या खेळाडूला आजीवन बंदी घातली जाईल अशी कायद्यात तरतूद आहे. खेळाडूंसाठी अशा प्रकारची चाचणी अनिवार्य करण्यात आल्याने ड्रग घेण्यावर लगाम लागला आहे.

सारंग यांनी पत्रात म्हटले आहे की, “शूटिंगच्या सेटवर येणाऱ्या प्रत्येकाची करोना चाचणी घ्यावी. त्यानंतरच त्यांना सेटवर येण्याची अनुमती मिळावी अशी अट घालण्यात आली आहे. अशाच प्रकारे ड्रग चाचणीबाबत केले जावे. शूटिंगसाठी सेटवर येण्यापूर्वी या सर्वांची डोपिंग चाचणी करण्यात यावी.’’