बाहुबली चित्रपटातील ‘ही’ अभिनेत्री पॉर्न स्टारच्या भूमिकेत 

मुंबई : वृत्तसंस्था – बाहुबली आणि बाहुबली २ चित्रपटातून अभिनेत्री राम्या कृष्णनने बाहुबलीची आई शिवगामी देवी शानदार पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर केली. शिवगामीची भूमिका साकारल्यानंतर राम्या आता वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवगामीची भूमिका साकारून देशभरात आपली ओळख निर्माण केलेली राम्या आता एका पॉर्न स्टारच्या भूमिकेत दिसणार आहे.

राम्या कृष्णन आगामी तमिळ भाषेतील ‘सुपर डीलक्स’ चित्रपटात एका पॉर्न स्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यागराज कुमारराज या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर ऑनलाईन रिलीज झाला तेव्हा त्याची खूप चर्चा झाली.

आपल्या भूमिकेविषयी राम्याने सांगितले, या चित्रपटातील भूमिका आपल्यासाठी चॅलेंजिंग असल्याचे राम्याने सांगितले. मी हा चित्रपट साईन केला तेव्हा प्रत्येकालाच धक्का बसला होता. माझ्यापेक्षा माझे सहकारी धक्क्यात होते. माझ्या मते, काही भूमिका पैशांसाठी असतात. काही लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि काही पॅशनसाठी. ‘सुपर डिलक्स’ मी पॅशनसाठी साईन केला, आहे. चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी दिग्‍दर्शक कुमारराजा यांच्‍यामुळे राम्याला एक खास सीनसाठी दोन दिवसांत ३७ वेळा रिटेक घ्‍यावे लागले.

या चित्रपटात राम्या एका लीला नावाच्‍या महिलेची भूमिका साकारत आहे, जी देहविक्रीचा व्यवसायात करत असते. हा चित्रपट २९ मार्चला रिलीज होणार आहे. राम्याशिवाय, चित्रपटात विजय सेथुपथी, समांथा, फहाद फासिल आणि मास्किन मुख्‍य भूमिकेत झळकणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us