रोड अ‍ॅक्सिडेंटमध्ये फिल्म डायरेक्टरचं निधन ! पहिल्या सिनेमाची होती ‘आतुरता’

पोलिसनामा ऑनलाइन –तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील प्रतिभावान नवोदित फिल्ममेकर अरुण प्रसाद याचं निधन झालं आहे. प्रसिद्ध डायरेक्टर शंकर यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. एका रिपोर्टनुसार, शुक्रवारी कोयंबतूरच्या मेट्टूपलायममधील एका रोड अॅक्सिडेंटमध्ये त्याचं निधन झालं. तो बाईकवरून जात असताना त्यांची गाडी लॉरीला धडकली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानं अनेक मोठ्या डायरेक्टर्सला असिस्ट केलं आहे.

प्रसिद्ध डायेरक्टर शंकर यांनी अरुणच्या निधनानंतर ट्विट करत लिहलं की, “युवा फिल्म डायरेक्टर अरुण प्रसादच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:खी आहे. तो कधी माझा असिस्टंट होता. तो खूप सरळ सकारात्मक आणि खूप मेहनती होता. देवाकडे प्रार्थना करतो त्याच्या कुटुंबीयांना या प्रसंगाला सामोरं जाण्याची शक्ती दे.”

अरुणने अनेक बड्या डायरेक्टर्सला असिस्ट केल्यानंतर एक सिनेमा बनवला होता. या सिनेमाचं नाव होतं 4G. जीवी प्रकाशनं यात मुख्य भूमिका साकारली होती. 2016 साली घोषणा केलेल्या पहिला सिनेमाची तो आतुरतेनं वाट पहात होता. जीवी कुमारनं अरुणच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे.