ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक बासु चटर्जी यांचे वयाच्या 90 व्या वर्षी मुंबईत निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रसिद्ध डायरेक्टर आणि रायटर बासु चॅटर्जी यांचं 90 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील सांताक्रूज येथील त्यांच्या घरीच त्यांनी अखरेचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून ते आजारी होते. त्यांना डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशरसंबंधित समस्याही होत्या.

अशोक पंडित यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना सांगितलं की, वयामुळं झालेल्या आजारांनी बासु चॅटर्जी यांचं निधन झालं आहे. आज दुपारी 2 वाजता सांताक्रूजच्या शवदाह गृहात त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील.

बासु यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी चित्तचोर, रजनी, बातों बातों में, उस पार, छोटी सी बात, खट्टा-मीठा, पिया का घर, चक्रव्यूह, शौकिन, रुका हुआ फैसला, जीना यहां, प्रियतमा, स्वामी अपने पराये अशा सिनेमांचं डायरेक्शन केलं आहे. 70 आणि 80 च्या दशकात त्यांनी आपली वेगळीच ओळख तयार केली होती. याशिवाय रत्नदीप, सफेद झूठ, मनपसंद, हमारी बहू अलका, कमला की मौत, त्रियाचरित्र हे सिनेमे खूप चर्चेत राहिले आहेत. बासु यांनी दूरदर्शनवरील ब्योमकेश बख्शी, रजनीगंधा अशा अनेक फेमस मालिकांचंही डायरेक्शन केलं आहे.

1969 साली आलेल्या सारा आकाश या सिनेमातून त्यांनी फिल्मी दुनियेत पाऊल टाकलं होतं. या सिनेमाचं डायेक्शन करण्याचाआधीही त्यांनी 1996 साली आलेल्या राज कपूर आणि वहिदा रहमान स्टारर तीसरी कसम या सिनेमाचे डायरेक्टर बासु भट्टाचार्य यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

बासु यांनी करिअरची सरुवात इलस्ट्रेटर आणि कार्टुनिस्ट म्हणून लोकप्रिय साप्ताहिक वर्तमानपत्र ब्लिट्ज मधून केली होती. या पेपरसाठी त्यांनी 18 वर्षे काम केलं. यानंतर त्यांनी सिनेमात डायरेक्शन करण्याचा निर्णय घेतला होता.