‘मरजावां’ सिनेमाच्या दुसऱ्या गाण्याचा टीजर रिलीज ! नोरा फतेहीचा ‘सिजलिंग’ अंदाज (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिलबर, साकी साकी यांसारखे अनेक हिट साँग दिल्यानंतर आता अभिनेत्री नोरा फतेही पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या तालावर थिरकायला भाग पडणार आहे. मरजावां सिनेमाच्या दुसऱ्या गाण्यात नोरा आयटम साँग करताना दिसणार आहे. एक तो कम जिंदगानी असे या गाण्याचे बोल आहेत. नोराने सोशल मीडियावर या गाण्याचा टीजर रिलीज केला आहे.

https://twitter.com/Norafatehi/status/1181511360242470917

हे गाणं 10 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. या गाण्यात नोराचा सिजलिंग अंदाज पाहायला मिळणार आहे. हे गाणं नेहा कक्कर आणि यश नार्वेकरनं गायलं आहे. तनिष्क बागचीने या गाण्याला म्युझिक दिलं आहे. रिलीज झाल्यानंतर या वर्षीच्या रिमेक गाण्याच्या यादीत एक तो कम जिंदगानी गाण्याचा समावेश होणार आहे.

मरजावां या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, तारा सुतारिया, रितेश देशमुख आणि रकुलप्रीत सिंह दिसणार आहे. हा सिनेमा 22 नोव्हेंबर 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Visit : Policenama.com