#VideoViraL : म्हणून पीएम नरेंद्र मोदी सिनेमाच्या निर्मात्याने आणि विवेकने स्वत: वाटला चहा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काल लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस होता. काल महाराष्ट्रासह सर्वच ठिकाणी भाजपाने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी येथून विजय झाले. या निमित्ताने भाजपा शिवसेना सबोतच त्यांच्या समर्थकांनीही देशभरात जल्लोष केला. या निमित्ताने पी एम नरेंद्र मोदी सिनेमाच्या निर्मात्याचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. काल त्यांना एवढा आनंद झाला की, त्यांनी आपल्या हाताने सर्व पत्रकारांना चहाचे वाटप केले. आनंद पंडित असं त्यांचं नाव आहे. सध्या आनंद पंडित यांचा हा चहा देतानाचा हा फोटो समोर आला असून तो खूपच व्हायरल होताना दिसत आहे.

काल पूर्ण देश जल्लोषाच्या मूडमध्ये होता. काल आनंद पंडित यांचा पीएम नरेंद्र मोदी या सिनेमाचे स्क्रीनिंग होते. कालच्या नरेंद्र मोदींच्या विजयामुळे आनंदून गेलेल्या आनंद पंडित यांनी स्क्रिनिंगला हजर असणाऱ्या पत्रकारांना स्वत: नम्र होत आपल्या हाताने चहाचे वाटप केले. इंस्टाग्रामवर एका अकाऊंटवरून आनंद पंडित यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. दरम्या आनंद पंडित यांनी हा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान आनंद पंडित यांच्याच इंस्टाग्राम अकाऊंटवरून आणखी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत, पीएम नरेंद्र मोदी या सिनेमात नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय देखील चहाचा कप भरताना दिसत आहे. त्यात तो खूप आनंदी दिसत आहे. अवघ्या एका तासात या व्हिडीओला 600हून अधिक लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

दोन पैकी कोणताही एख फीचर फोटो घ्या