Film Producer Vibhu Agrwal | चित्रपट निर्माता विभू अग्रवालवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप, मुंबई पोलिसांनी केली अटक

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Film Producer Vibhu Agrwal | मागील काही दिवसापासून चित्रपट निर्मितीत काही वेगवेगळे प्रकरण समोर येताना दिसत आहे. याचबरोबर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चित्रपट निर्माता विभू अग्रवालला (Film Producer Vibhu Agrwal) लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याबाबत एका महिलेने अग्रवाल यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणावरून चित्रपट क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तसेच, त्यांच्या कंपनीची कंट्री हेड अंजली रैनावर (Anjali Raina) देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या अग्रवाल हे मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अटकेत आहेत.

याबाबत माहिती अशी की, उल्लू डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड’ (Ullu Digital Pvt Ltd) कंपनीचे
मुख्य कार्यकारी (CEO) अधिकारी विभू अग्रवालला भादवि कलमान्वये 354 नुसार
लैंगिक शोषणाचा (Sexual abuse) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसेच विभू अग्रवाल बरोबरच कंपनीच्या कंट्री हेड अंजली रैनावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभू अग्रवालने 2013 मध्ये ‘बात बन गयी’ ची निर्मिती केली होती.
त्यानंतर 2019 साली त्यांनी उल्लू ऍप लॉन्च केला होता.
यावर हिंदी इंग्लिशमधील बोल्ड कंटेंट दाखवला जातो.
केवळ हिंदी इंग्लिशचं नव्हे तर भोजपुरी, तमिळ, तेलुगु, मराठी पंजाबी अशा वेगवेगळ्या भाषांमधील बोल्ड कंटेंट दाखवला जातो.

दरम्यान, उल्लू डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड असं विभू अग्रवाल (Vibhu Agrwal) यांच्या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी अडल्ट कंटेंट तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
त्यात विभू अग्रवाल आणि अंजली रैनावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप करत गुन्हा दाखल केल्याचं म्हटलं आहे.
असं एका वृत्तानुसार माहिती समोर आली आहे.

 

Web Title : film producer vibhu agrwal arrested by mumbai police in case of sexual harrashment mhad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय, रिटर्न न भरणारे 15 ऑगस्टपासून करू शकणार नाहीत हे काम

Zika Virus | पुणे जिल्ह्यातील झिका नियंत्रणात; केंद्रीय पथकाकडून पाहणी

Pune Crime | पुण्यात ‘रो हाऊस’साठी गुंतवणूक केलेले पैसे परत न मिळाल्याने कॅटरिंग व्यावसायिकाची आत्महत्या