Lockdown दरम्यान ‘या’ आईनं ‘डोनेट’ केलं स्वतःचं 42 लीटर ब्रेस्ट मिल्क !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकदा लहान मुलांना दुधाची ( Milk) कमी जाणवत असते. त्यामुळे अनेकदा ब्रेस्ट दूध विक्रीसाठी उपलब्ध असते. अशाचप्रकारे लॉकडाउन ( Lockdown) दरम्यान तब्बल ४२ लिटर ब्रेस्ट मिल्क डोनेट ( Donate) करून एक निर्माती चर्चेत आली आहे. ४२ वर्षीय फिल्ममेकर आणि निर्माती निधी परमार हिरानंदानी ( Nidhi Parmar Hiranandani) यांची चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यांनी लॉकडाउनदरम्यान तब्बल ४२ लिटर ब्रेस्ट मिल्क डोनेट केलं आहे. यावर्षीच त्या आई झाल्या आहेत. आपले ब्रेस्ट मिल्क शिल्लक राहत आहे, असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी फॅमिली आणि नातेवाइकांसोबत चर्चा केली. अनेक सल्ले मिळाले आणि त्यानंर त्यांनी ब्रेस्ट मिल्क डोनेट करण्याचा निर्णय घेतला.

बाळ पुरेसं दूध पीत नव्हतं

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, ‘मुलाच्या जन्मानंतर मला असं जाणवत होतं की, खूप सारं ब्रेस्ट मिल्क वाया जात आहे. कारण मुलगा पूर्ण दूध पित नव्हता. त्यावेळी माझ्याकडे १५० एमएलची तीन पॅकेट्स होते. मला या दुधाचा वापर करायचा होता. माझ्या घरातील फ्रीजर ब्रेस्ट मिल्कने भरलेलं होतं. मी इंटरनेटवर वाचलं होतं की, ब्रेस्ट मिल्क ३ ते ४ महिने फ्रीजरमध्ये ठेवलं जाऊ शकतं’, त्यामुळे मी यासंदर्भात इंटरनेटवर अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांना अमेरिकेत हे दूध डोनेट केले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या आजूबाजूच्या भागात डोनेशन सेंटर्सचा शोध घेतला. यादरम्यान एका गायनोकॉलॉजिस्टने त्यांना मुंबईतील एका हॉस्पिटलबाबत माहिती दिली. इथे ब्रेस्ट मिल्क बॅंक चालवली जात होती. निधी या ‘सांड की आंख’ सिनेमाच्या निर्मात्या होत्या. त्यानंतर कोरोना लॉकडाउनच्या काळात त्यांनी मिल्क सूर्या हॉस्पिटलच्या नियोनेटल इंटेसिव्ह केअर युनिटला तब्बल ४२ लिटर ब्रेस्ट मिल्क डोनेट केलं.

वर्षभर डोनेट करणार दूध

याविषयी बोलताना निधी यांनी सांगितले की, त्यांनी नुकतीच हॉस्पिटलला भेट दिली आणि काम कसं सुरू आहे हे पाहिलं. तिथे त्यांना ६० असे बाळ दिसले ज्यांना दुधाची गरज होती. त्यानंतर त्या म्हणाल्या की, त्या यावर्षी पूर्ण प्रयत्न करतील की, त्या या बाळांना दूध डोनेट करत राहतील.