प्रसिद्ध ‘दिग्दर्शका’च्या कुटुंबातील सदस्याचा ‘कोरोना’मुळं मृत्यू, अंतिम ‘दर्शन’ही घेता आलं नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाविषाणूमुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. देशात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील प्रवासाची साधनं देखील बंद करण्यात आली आहेत. कोरोना विषाणूने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि सामन्य नागरिकांपासून, राजकीय, पोलीस, आरोग्य आणि सेलिब्रेटींना देखील आपल्या विळख्यात घेतले आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता करण कुमार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर आता प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक कुणाल कोहली यांच्या कुटुंबातील सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याबद्दल त्यांनी स्वत: ट्विट करून याची माहिती दिली.

कुणाल कोहली यांनी कोरोनामुळे त्यांच्या कुटुंबातील प्रिय व्यक्तीला गमावलं आहे. कुणाल कोहली यांनी कोरोना व्हायरसमुळे त्यांच्या मावशीचं निधन झाल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. यासोबत त्यांच्या अखेरचं दर्शनही घेऊ न शकल्याची खंत त्यांनी या ट्विमधून बोलून दाखवली आहे. कुणाल यांचं म्हटलं आहे, मावशीच्या निधनानंतर त्यांच पूर्ण कुटुंब एकत्र येऊन शोक व्यक्त करू शकत नाही. कोरोनामुळे 8 आठवड्यांच्या संघर्षानंतर मी माझ्या मावशीला गमावलं. त्या शिकागोमध्ये होत्या आणि मी त्यांचं अंतिम दर्शन सुद्धा घेऊ शकलो नाही, असे ट्विटमध्ये त्यांनी लिहलं आहे.

कुणाल यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे की, आमचं कुटुंब खूप मोठं आहे आणि सर्वांचं एकमेकांशी चांगलं बॉन्डिंग आहे. पण या कठीण काळात आम्ही सर्वजण एकमेकांसोबत नाही आहोत. आता माझी आई, मावशी आणि मामा यांना एकत्र कधीच पाहू शकणार नाही. ही वेळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. त्यांची मुलगी रोज हॉस्पिटलला जात असे आणि आपल्या कारमध्ये बसून प्रार्थना करत असे. कारण त्यांना आत जाण्याची परवानगी नव्हती. कोरोना व्हायरसनं काय वेळ आणली आहे आपल्यावर असं व्हायला नको.

कुणाल यांच्या ट्विटवर अनेक सेलीब्रेटींनी कमेंट केल्या आहेत. यासोबतच त्यांच्या मावशीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या आत्म्यास देव शांती देवो अशी प्रार्थना सुद्धा केली आहे. याशिवाय शनिवारी अभिनेता वरूण धवनच्या मावशीचं सुद्धा कोरोना व्हायरसमुळे निधन झालं. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट करून याबाबत माहिती दिली होती.