सिनेमा दिग्दर्शक बासु चॅटर्जींच्या निधनानंतर PM मोदी, ‘बिगबीं’सह अनेक दिग्गजांनी व्यक्त केला ‘शोक’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   प्रसिद्ध डायरेक्टर आणि रायटर बासु चॅटर्जी यांचं 90 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील सांताक्रूज येथील त्यांच्या घरीच त्यांनी अखरेचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून ते आजारी होते. त्यांना डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशरसंबंधित समस्याही होत्या. त्याच्या निधनानंतर आता बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिग बी अमिताभ बच्चनसह अनेक बड्या कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.

पीएम मोदी ट्विट करत म्हणाले, “श्री बासु चॅटर्जी यांचं निधन झाल्याचं ऐकल्यानंतर खूप दु:ख वाटत आहे. त्यांचं काम खूप शानदार संवदेनशील होतं जे खूप सामान्य जटील भावना व्यक्त करतं. लोकांच्या संघर्षाबद्दलही सांगतं. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना माझी सहानुभूती.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं की, “बासु चॅटर्जींच्या निधनाबद्दल माझी सांत्वना आणि सहानुभूती. एक शांत मृदुभाषी, सज्जन व्यक्ती. त्यांचे सिनेमांचे प्रतिबिंब मध्य भारतावर पडले आहे. मी त्यांच्यासोबत मंजिलमध्ये काम केलं होतं. खूप दु:ख होत आहे. या वातावरणात त्यांचं रिमझिम गिरे सावन हे गाणं आठवत आहे.”

रामानंद सागर यांच्या रामायणमधील राम अरुण गोविल म्हणतात, “चितचोर आणि रजनीगंधा असे सुपरहिट सिनेमे देणारे डायरेक्ट बासु चॅटर्जी यांचं निधन म्हणजे सिनेम जगताचं खूप मोठं नुकसान आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

इंडियन फिल्म अँड टीव्ही डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी त्यांच्या निधनाची बातमी शेअर केली होती. ते म्हणाले होते की, “मला हे सांगताना खूप दु:ख होत आहे की, दिग्गज फिल्ममेकर बासु चॅटर्जी आपल्यात नाहीत. तुमची खूप आठवण येईल सर.”

याशिवाय फिल्ममेकर अनुराग कश्यप आणि जिम्मी शेरगील यांनीही बासु यांना श्रद्धांजली दिली आहे.