फिल्ममेकर’ सुधीर मिश्राच्या वडिलांचं निधन, बॉलिवूड कलाकारांनी व्यक्त केला ‘शोक’ !

पोलीसनामा ऑनलाईन :फिल्ममेकर सुधीर मिश्रा यांचे वडिल डॉक्टर देवेंद्र नाथ मिश्रा यांचं आज (गुरुवार दि 2 एप्रिल 2020 रोजी) निधन झालं आहे. सुधीर मिश्रा यांनी ट्विट करत आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

सुधीर मिश्रा यांनी ट्विट करत लिहिलं की, “माझे वडिल डॉक्टर देवेंद्र नाथ मिश्रा यांचं आज सकाळी निधन झालं आहे. लखनऊचा एक मुलगा, एक मॅथमॅटिशियन, आणि नंतर मॅथमॅटीक्सचे प्रोफेसर, सागर युनिव्हर्सिटी, ज्वाईंट एज्युकेशन अॅडवायजर, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, डेप्युटी डायरेक्टर CSIR, एमपी सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे हेड आणि BHU चे व्हाईस चांसलर.”

ही बातमी समोर आल्यानंतर अनेक कलाकार शोक व्यक्त करताना दिसत आहेत. सोनू सूद, निखिल आडवाणी, हंसल मेहता अशा अनेक ट्विट करत सोशल मीडियावरून त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या सुधीर मिश्रा आणि इतर कलाकरांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. कलाकारांव्यतिरीक्त अनेक चाहतेही त्यांच्या ट्विटवर कमेंट करत व्यक्त होत आहेत.