खुशखबर ! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून तिसरं आर्थिक पॅकेज जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली आहे. अर्थव्यवस्था सुधारत असून, मूडीजनेदेखील कॅलेंडर वर्ष २०२० आणि २०२१ मध्ये भारताच्या जीडीपीत वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.

पत्रकारांना बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, “अर्थव्यवस्था वेगाने सुधारत आहे. ऑक्टोबरमध्ये जीएसटी कलेक्शन १ लाख कोटींपेक्षा अधिक झाले. त्याचसोबत एफडीआय गुंतवणूक वाढली आहे. बँकांच्या कर्जतसुद्धा मागील वर्षीच्या तुलनेत सुधारणा झाली आहे.”

तथापि, सरकारकडून नव्या पॅकेजची घोषणा अशावेळी करण्यात येत आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच प्रोडक्शन-लिंक्ड इन्सेन्टिव्स (PLI – Production-Linked Incentives) योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तद्वत, अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर भारत योजेनच्या प्रगतीबाबत माहिती देताना शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. बँकांच्या क्रेडिट ग्रोथमध्ये ५.१ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. अर्थव्यवस्थेसंदर्भात आरबीआयचे अनुमानही तिसऱ्या तिमाहीत सकारात्मक आहे.

आत्मनिर्भर भारत योजेनबाबत बोलताना निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, “२८ राज्य आणि केंद्र शासित प्रदेश ‘एक राष्ट्र एक रेशन कार्ड’ योजनेशी जोडण्यात आले आहेत. पीएम स्वनिधी योजनेसाठी २६.२ लाख नागरिकांनी अर्ज केला आहे. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत सरकार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असून, ही योजना १ ऑक्टोबर २०२० पासून लागू झाली आहे. ती २ वर्षांसाठी असेल. ईपीएफओ रजिस्टर्ड कंपनीत एखादा नवीन कर्मचारी काम करण्यास सुरू करतो आणि त्यास १५ हजारांपेक्षा कमी पगार असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येईल,” असे त्यांनी सांगितले.