अंतिम वर्षाचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी एप्रिल-मे मध्ये होणारी अंतिम वर्षाची परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आली. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने निकालही तातडीने लावला. मात्र अद्याप विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाली नाही. गुणपित्रका न मिळाल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी व नोकरीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना तातडीने गुणपत्रिका( Marklist ) द्यावी, अशी मागणी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत व राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर ( Dr. Suhas Pednekar) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आयडॉलचे विद्यार्थीदेखील अद्यापही गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत आहेत.

कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना केवळ गुणपत्रिका वेळेवर न दिल्याने नोकरी गमावणे परवडणारे नसल्याची प्रतिक्रिया बीकॉमची परीक्षा आयडॉलमधून पास झालेल्या विद्यार्थ्याने दिली. लवकरात लवकर गुणपत्रिका द्यावी किंवा आम्हाला पर्यायी लिखित प्रमाणपत्र तरी द्यावे, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.