Pune Municipal Corporation | अखेर ‘या’ 23 गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश, राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन  (Policenama Online) –  पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) हद्दीत 23 गावांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून होती. अखेर या मागणीवर राज्य शासनाने (State Government) शिक्कामोर्तब केले आहे. या संदर्भात शासन निर्णय (GR) देखील जारी करण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे पुणे महानगरपालिकेची (Pune Municipal Corporation) हद्द वाढणार आहे. पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) क्षेत्राच्या सीमात फेरफार करण्याच्या दृष्टीने त्यामध्ये काही क्षेत्रे समाविष्ट (merge) करण्याचे म्हटले होते. त्यानुसार हरकती व सूचनांचा शासनाने विचार करुन 23 गावांचा पुणे मनपात समावेश करण्याचा निर्णय आज जाहीर केला आहे. (merge of 23 villages in Pune Municipal corporation pmc)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

ग्रामस्थांकडून शासनाच्या निर्णयाचे स्वागत

पुणे महानगरपालिका क्षेत्रात 23 गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) जाहीर केला आहे. त्यानुसार आता प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. या निर्णयावर कृती समितीने (Kruti Samiti) स्वागत करत म्हटले की, हा निर्णय नक्कीच अभिनंदनीय आहे. समाविष्ट 23 गावातील (merge of 23 villages) विकासकामांचा (development work) मार्ग मोकळा झाला आहे. यठिकाणी नियोजनबद्ध विकास (Planned development) कामे करणे शक्य होणार आहे. समाविष्ट 23 गावातील रस्ते (Roads), वीज (electricity), पाणी (water), ड्रेनेज (drainage), कचरा (waste), आरोग्य (health), शिक्षण (education), सार्वजनिक वाहतूक (public transport) हे प्रश्न सुटणार आहेत. एकूणच या गावातील राहणीमानाचा दर्जा आता उंचावणार आहे. पुणे शहर (Pune City) हे आता खऱ्या अर्थाने देशातील सर्वात मोठे शहर (The largest city in the country) झाले आहे.

 

या 23 गावांचा पुणे मनपात समावेश होणार

म्हाळुंगे (Mahalunge)

सूस (Sus)

बावधन बुद्रुक (Bavadhan Budruk)

किरकिटवाडी (Kirkitwadi)

पिसोळी (Pisoli)

कोंढवे – धावडे (Kondhve – Dhavade)

कोपरे (Kopare)

नांदेड (Nanded)

खडकवासला (Khadakwasla)

मांजरी बुद्रुक (Manjari Budruk)

नऱ्हे (Narhe)

होळकरवाडी (Holkarwadi)

औताडे-हांडेवाडी (Autade-Handewadi)

वडाची वाडी (Vadachi Wadi)

शेवाळेवाडी (Shewalewadi)

नांदोशी (Nandoshi)

सणसनगर (Sanasnagar)

मांगडेवाडी (Mangdewadi)

भिलारेवाडी (Bhilarewadi)

गुजर निंबाळकरवाडी (Gujar Nimbalkarwadi)

जांभुळवाडी (Jambhulwadi

कोलेवाडी (Kolewadi)

वाघोली (Wagholi)

Web Title : Finally, 23 villages have been included in the Pune Municipal Corporation, a notification has been issued by the state government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Minister Varsha Gaikwad यांचे शिक्षणाधिकार्‍यांना आदेश, म्हणाल्या – ‘विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार्‍याना शाळांची मान्यताच रद्द करा’