शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन अखेर मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

हे सरकार शेतकरी विरोधी असून त्यांनी आमची कोणतीच मागणी मान्य केलेली नाही. आम्ही हे आंदोलन आता मागे घेत आहोत, असे जाहिर करत दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. हरिद्वार येथून ही किसान क्रांती यात्रा दिल्लीतील किसान घाट येथे आली होती. शेतकऱ्यांनी किसान घाट येथे फुले वाहून आपले आंदोलन संपल्याचे जाहीर केले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff1f8d85-c6b8-11e8-9bad-d59bf1aae880′]

दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेश सीमेवरून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश दिला. दिल्लीत प्रवेश देण्यात येत असल्याचे समजताच रस्त्यांवर झोपलेले शेतकरी जागे झाले आणि त्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन दिल्लीकडे कूच केली. रात्री उशिरापर्यंत यूपी गेट आणि लिंक रस्त्यावर ३००० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.

९ लाख टन कचर्‍यावर बायोमायनिंग प्रक्रिया

मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश दिला नाही. त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांनी जबरदस्तीने आत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मते, शेतकऱ्यांनी दगडफेक केली. त्याला उत्तर देताना पोलिसांनी अश्रूधूर सोडला, पाण्याचा मारा, लाठीचार्ज आणि रबराच्या गोळ्याही झाडल्या. ट्रॅक्टरमधील हवा काढण्यात आली. सुमारे अर्धा तास तणावाचे वातावरण होते. यात १०० हून अधिक शेतकरी जखमी झाले.

[amazon_link asins=’B072JJPHV1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c4299933-c6b9-11e8-a839-4d421cc83e52′]


लातूर : नापीकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

चाकूर तालुक्यातील नांदगाव येथे खरीप हंगामातील नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. माधव कोलपके (४८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. माधव कोलपके यांनी खरीप हंगामात तब्बल ४ एकरामध्ये सोयाबीनचे पिक घेतले होते. याकरिता हजारो रुपये खर्च करूनही उत्पादन पदरी न पडल्याने त्यांना नैराश्य आले होते. शिवाय घरखर्चासाठी घेतलेल्या रकमेचीही परतअ‍ेड होत नव्हती. त्यामुळे त्यांनी गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले.

हंगामाच्या सुरवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सोयाबीनचे पिक जोमात होते. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनचा पाचोळा झाला होता. मुख्य पिकाचे निसर्गाच्या अवकृपेमुळे न भरून निघणारे नुकसान झाल्याने ते चिंताग्रस्त होते. हा ताण सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.