उस्मानाबाद : अखेर ‘तो’ शिक्षणाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

लैंगिक छळ प्रकरणात फरार असलेला शिक्षणाधिकारी सचिन जगतापला पोलिसांनी ताब्यात घेतले. फरार सचिन जगताप स्वतः हुन पोलीस उपविभागीय कार्यालयात मंगळवारी (दि.२२) सायंकाळी सात वाजता शरण आला.

सहकारी महिला कर्मचा-याचा छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्या पासून सचिन जगताप होता. त्याने औरंगाबाद कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु औरंगाबाद हाय कोर्टाने जमीन फेटाळला होता. जगताप याला बुधवारी (दि.२३) कोर्टात हजर करणार आहेत.