अखेर श्रद्धा कपूरने दिली कबुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

बॉलिवूड ची आघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचे नाव काही दिवसांपूर्वी को-स्टारशी जोडले गेले होते. या घटना बॉलिवूडमध्ये काही नवे नाही. अश्या घटना नेहमी होताच असतात. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सुद्धा यातून गेली आहे. ‘आशिकी2’ रिलीज झाल्यानंतर श्रद्धाचे नाव तिचा यातील को-स्टार आदित्य रॉय कपूरसोबत जोडले गेले होते. त्यावेळी आदित्य आणि श्रद्धा यांच्या रिलेशनशिपची बरीच चर्चा झाली. पण अवघ्या काही दिवसातच त्यांचे रिलेशनशिप संपले . त्यानंतर त्यांच्या सिनेमाची जादूही ओसरली. त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री हि जास्त दिवस राहिली नाही. कारण ‘आशिकी2’नंतरचा या दोघांचा ‘ओके जानू’ दणकून आपटला. त्या सिनेमाला बॉक्स ऑफिसावर जास्त चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
[amazon_link asins=’B07DM3RX4M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’57055528-9256-11e8-b4f7-13d6e2399827′]
आदित्यनंतर श्रद्धाचे नाव फरहान अख्तरसोबत जोडले गेले. या दोघांच्या प्रेमाची चर्चाही प्रचंड रंगली. शक्ती कपूर यांना न जुमानता श्रद्धा फरहानसोबत लिव्ह इनमध्ये राहणार होती. अश्या अनेक बातम्या आल्या होत्या. कालांतराने हे रिलेशनशिपही संपले. पण हे रिलेशनशिप श्रद्धाला खूप त्रास झाला असे बोलले जात आहे. हे रिलेशनशिप तिला खोल जखम देऊन गेले. होय, कारण असे नसते तर काल ‘स्त्री’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटवेळी श्रद्धा जे काही बोलली ते तिला आलेल्या अनुभवातून ‘स्त्री’साठी सर्वाधिक वेदनादायी गोष्ट कुठली? असा प्रश्न या ट्रेलर लॉन्चवेळी श्रद्धाला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ‘हृदयभंग सर्वाधिक वेदना देऊन जातो,’ असे श्रद्धा बोलून गेली. मनातले ते ओठांवर येतं म्हणतात, तसेच काही तिच्याबद्दल झाले.

फरहान आणि श्रद्धाने पहिल्यांदा ‘रॉक आॅन-२’ मध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगपासूनच दोघांमधील अफेअरच्या चर्चा समोर आल्या होत्या. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचेही समोर आले होते. श्रद्धामुळे फरहानची पहिली पत्नी अधुनाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. फरहान आणि अधुनाच्या घटस्फोटासाठी अभिनेत्री श्रद्धा कपूर जबाबदार असल्याचीही चर्चा त्यावेळी रंगली होती. फरहान आणि श्रद्धाची वाढती मैत्री अधुनाला अजिबात पसंत नव्हती. यावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. अखेर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.