अखेर स्थायी सभापतीपदी विलास मडिगेरी यांची निवड

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी अखेर भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी यांची निवड झाली आहे. बंड केलेल्या शीतल शिंदे यांनी मागार घेतल्यानं मडिगेरी यांचा सभापतीचा मार्ग मोकळा झाला. भाजपा व शिवसेनाच्या पाठबलावर मडिगेरी यांनी 8 मताच्या फरकाने विजय मिळवला. त्यात एकून 12 मते मडिगेरी यांना मिळाली तर राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांना 4 मते मिळाली.

स्थायी समिती सभापती पदासाठी आज निवडणूक झाली. सभापती पदासाठी नगरसेवक विलास मडिगेरी यांना भाजपची अधीकृत उमेदवारी दिली होती. दरम्यान भाजपचेच शीतल शिंदे यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आपला अर्ज भरला होता. मात्र शिंदे यांनी मागार घेतल्याने भाजपचे विलास मडिगेरी व राष्ट्रवादी काॅग्रेसचे मयूर कलाटे यांच्यात सभापतीपदासाठी लढत झाली. त्यामध्ये मडिगेरी यांना 12 मते मिळाली तर, 4 मते मयूर कलाटे यांना मिळाली. शिवसेनेचे एक मत देखील भाजपचे मडिगेरी यांनाच मिळाले. त्यामुळे मडिगेरी यांची सभापती पदावर मताधिक्याने निवड झाली आहे.

महत्वाच्या बातम्या..

पुन्हा PM Vs DM : पंकजांनी 106 कोंटींचा मोबाईल घोटाळा केल्याचा धनंजय यांचा गंभीर आरोप

धुळे : एसआरपी दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

राफेल प्रकरणाची फाइल जाळली असावी…!

‘सामना’ ने घेतला यू-टर्न ; सरकाराचे ‘रेकॉर्डब्रेक’ कौतुक

पुणे : काॅलेजच्या कॅन्टीनमध्ये ‘त्या’ दोघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ