Coronavirus : धारावीतून आली चांगली बातमी ! पहिल्यांदाच ‘कोरोना’ग्रस्तांच्या संख्येत घट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशात महाराष्ट्रा सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मुंबईत कोरोनाचा मोठा हॉटस्पट असलेल्या धारावी झोपडपट्टीत कोरोनाने शिरकाव केला आहे. धारावीत कोरोनाचे रुग्ण झापाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यातच आज धारावीतून एक चांगली बातमी समोर आली आहे.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोना विषाणूने शिरकाव केल्यानंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मागील तीन दिवसात धारावीतील नव्या रुग्णांच्या संख्येत घट पहायला मिळत आहेत. आतापर्यंत धारावीत कोरोनाची रुग्णसंख्या 1639 पर्यंत पोहचली आहे. धारावीत मागील 24 तासात केवळ 18 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन दिवसात धारावीतील नव्या रुग्णांच्या संख्येत घट पहायला मिळत आहे.

धारावीमध्ये आज 18 रुग्ण आढळून आले आहेत. तर 26 मे रोजी 38, 25 मे 42 आणि 24 मे रोजी 27 रुग्ण आढळून आले होते. धारावीसह जी उत्तर मधील रुग्णसंख्या वाढत असल्याने आकडेवारीत मोठ्या प्रमाणात घट जाणवत आहे. मागच्या तीन दिवसांत दादर माहीम, धारावीमध्ये एकूण 128 रुग्णांची वाढ झाली आहे, जी गेल्या आठवड्यापेक्षा कमी आहे.