पुण्यातील ‘सविता भाभी’ च्या होर्डिंग्सचं ‘गुढ’ उकललं (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खोचक, टोमणे मारणाऱ्या गंमतीदार पाट्यांमुळे पुणेकर प्रसिद्ध आहेत. आपल्या खास शैलीत खोचक टोमणे मारणे हे पुणेकरांचे वैशिष्ट्य आहे. पुणेरी पेठांमध्ये पुणेरी पाट्या हमखास दिसतात. पुणेकरांच्या या पाट्यामुळे बाहेरून येणारे नागरिक गोंधळून जातात. मात्र, काल चौकाचौकात लागलेल्या एका होर्डिंग्जमुळे पुणेकरच गोंधळून गेले. ‘सविता भाभी…. तू इथंच थांब !!’ असे लिहलेले होर्डिंग्ज संपूर्ण पुण्यात लागले होते. या होर्डिंग्जवर दुसरे काहीही लिहलेले नव्हते. त्यामुळे पुणेकर चांगलेच गोंधळून गेले होते. या सविता भाभीची उत्सुकता पुणेकरांना लागली होती. अखेर त्याचं गुढ उलगडलं आहे.

पुण्यात लावण्यात आलेल्या होर्डिंग्स ही ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या नव्या चित्रपटाची जाहिरात असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता धर्मकीर्ती सुमंत, अभिनेत्री पर्ण पेठे आणि अभिनेता आलोक राजवाडे यांचा हा उपक्रम आहे. ही जाहिरात त्यांच्या आगामी चित्रपटाची आहे. तसेच त्यांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून यामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा आवाज आहे.

यामध्ये सई ताम्हणकर स्वत:ला सविता म्हणत आहे. गरजेपेक्षा जास्त माहिती आहे मात्र तुम्ही तिला कधीच पाहिलं नाही… जिला कुणी कधीच पाहिलेलं नाही… असं सई म्हणाली आहे. यामध्ये सई बरोबरच एका तरुणाचाही आवाज आहे. या सिनेमाचा ट्रेलर 6 मार्चला प्रकाशित होणार आहे. अश्लिल उद्योग मित्र मंडळ नावाचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर आणि अमेय वाघ यांच्या मुख्य भूमिका आहेत.

‘सविता भाभी…. तू इथंच थांब !!’ असे लिहलेले होर्डिंग्स म्हात्रे पूल आणि निलायम ब्रिजजवळ लावण्यात आले होते. या होर्डिंग्सची सर्व पुण्यात चर्चा होती. हे पोस्टर्स वाचून पुणेकरांना हसू ही फुटले आणि ते बुचकळ्यातही पडले. या होर्डिंग्सचा नेमका काय अर्थ आहे हे पुणेकरांना समजलाच नाही. ही सविता भाभी नेमकी कोण ? अश्लील कॉमिक कॅरॅक्टर असलेल्या सविता भाभीचा हा संदर्भ आहे का ? याबाबत काही कळू शकले नव्हते. मात्र आता या पोस्टर्सचे गुढ उलगडले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like