दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये होणार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे लांबलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा अखेर नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये घेणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहीती दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावरून सोमवार (दि. 19) पासून ऑनलाईन अर्ज भरता येईल. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत दि. 29 ऑक्टोंबरपर्यंत आहे. तर 30 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येईल. ही प्रक्रीया ऑनलाईन असल्याने विद्यार्थ्यांना शाळा किंवा महाविद्यालयामार्फत अर्ज भरावे लागणार आहे. उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना दि. 3 व 4 नोव्हेंबरला बॅंकेत शुल्क भरावे लागणार आहे. तर दि. 5 नोव्हेंबरला शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळाकडे जमा कराव्या लागणार आहेत.

साधारण मार्च महिन्यांत परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जुलै- ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाते. मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. परीणामी मार्चमधील परीक्षांचा निकालही लांबणीवर पडला. जुलै महिन्यात निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचे वेध लागले होते. परंतु कोरोनाचे संकट असल्याने परीक्षाबाबत अनिश्चतता होती. परीक्षा न झाल्यास अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती होती. पण अखेर राज्य मंडळाने नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये परीक्षा घेणार असल्याचे स्पष्ट केले.

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेत नियमित, पर्नपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार अंतर्गत तुरळक विषय घेऊन परीक्षा ऑनदेऊ इच्छीणा-या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे.
ऑनलाईन अर्जासाठी संकेतस्थळ

ऑनलाईन अर्ज भरण्याचा तारखा
नियमित शुुल्कासह :  दि. 20 ते 29 ऑक्टोंबर
विलंब शुल्कासह    :  30 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर