आश्चर्य! राज्याची खालावलेली अर्थस्थिती चार दिवसात सुधारली, वित्त आयोगाची किमया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती खालावली असून कठोर उपायांची आवश्यकता आहे, असे टिपण केंद्रीय वित्त आयोगाने शनिवारी केले होते. मात्र, केवळ चार दिवसांत आपल्याच टिपणावरून केंद्रीय वित्त आयोगाने अर्थपूर्ण घुमजाव केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याचे प्रशस्तिपत्रकच आयोगाने बहाल केले आहे. अवघ्या चार दिवसात राज्याने कोणती जादू केली ज्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम झाली असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवाय, यामुळे वित्त आयोगानेही स्वत:बद्दल संशय निर्माण केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’67108fab-bc89-11e8-a7cb-d5ee02bd1a95′]

वित्त आयोगाने राज्याच्या आर्थिक स्थिती खालावल्यचे टिपण केले होते. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ते राज्यातील सत्ताधाèयांना अडचणीचे ठरणार असे बोलले जात होते. शिवाय या टीपणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी चांगलेच फैलावर घेतले होते. यामुळे राज्य सरकारने दिल्लीला धाव घेत आयोगाचीच दिल्ली दरबारी तक्रार केली. यानंतर चक्रे फिरल्यानंतर आयोगाने खालावलेल्या आर्थिक स्थितीतील महाराष्ट्र पुन्हा आर्थिक आघाडीवर नेऊन ठेवण्याची किमया करून दाखवली. दिल्ली दरबारातील दबाव किती मोठा आहे, यातून दिसून आले आहे. दरम्यान, आम्ही तयार केलेल्या टिपणातील आकडेवारी ही राज्याच्या महालेखापालांनीच दिली होती, असे वित्त आयोगाने स्पष्ट केले आहे.

वित्त आयोगाने आमच्या मागण्यांचा गंभीरपणे विचार करावा : मुख्यंमत्री

केंद्रीय वित्त आयोगाच्या मुंबई भेटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने शनिवारी हे टिपण प्रसिद्ध करण्यात आले. यात २००९ ते २०१३ आणि २०१४ ते २०१७ या काळातील अर्थव्यवस्थेची तुलना करण्यात आली होती. आघाडी सरकारच्या काळात आर्थिक परिस्थिती चांगली होती. या तुलनेत भाजप-शिवसेना सरकारच्या काळात अर्थव्यवस्था खालावल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. तसेच करवसुली फडणवीस सरकारच्या काळात कमी झाल्याकडे लक्ष वेधण्यात आले. यावरून विरोधकांनी फडणवीस सरकारला धारेवर धरल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत तक्रार केली. तसेच वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग आणि अन्य सदस्यांकडे तीव्र नापसंती व्यक्त केली. बुधवारच्या बैठकीतही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारची वित्त आयोगामुळे बदनामी झाल्याचे कोरडे ओढले होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या तक्रारीनंतर वित्त आयोगाचे अध्यक्ष सिंग यांनी अवघ्या चार दिवसांत घूमजाव केले. सारे काही आलबेल आहे.

पुण्यातील गदिमा स्मारकाच्या कामात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे