पुण्यात भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर मारहाण करत ३ लाख ११ हजार रुपये लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – येरवडा येथे गजबजलेल्या नगर रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयासमोर चोरट्यांनी भरदिवसा एकाला मारहाण करून चौघांनी ३ लाख ११ हजारांची रोकड लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

या मारहाणीत सुधाकर क्षीरसागर (वय ३७,रा.आळंदी रस्ता) जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार अनोळखी व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षीरसागर एका खासगी फायनान्समध्ये नोकरी करतात.

त्यांच्याकडे विश्रांतवाडी, प्रतिकनगर, नागपूर चाळ, येरवडा भागातील व्यावसायिकांकडून रक्कम जमा करण्याची जबाबदारी आहे. फायनान्स कंपनीचे मालक मुकेश गोयल यांनी त्यांना शुक्रवारी सकाळी व्हॉटसअ‍ॅपवर यादी दिली होती. त्या यादीनुसार क्षीरसागर हे रोकड जमा करत होते. त्यावेळी दुपारी दीडच्या सुमारास ते येरवड्यातील क्षेत्रीय कार्यालयासमोरून कोरेगाव पार्कच्या दिशेने जात होते. त्यावेळी एकाने त्यांना तेथील बसस्टॉपसमोर अडविले. त्यानंतर त्याने अचानक त्यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरूवात केली. माझ्या अंगावर गाडी का घातली ? अशी विचारणा करत त्याच्या इतर साथीदारांसोबत झटापट करण्यास सुरूवात केली.

त्यानंतर त्यांच्या डोक्यात कठीण वस्तूने मारहाण केली. त्यानंतर क्षीरसागर यांची सॅकबॅग आणि मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले. त्या सॅकमध्ये क्षीरसागर यांनी जमा केलेले ३ लाख ११ हजार ८०० रूपये होते. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे तपास करत आहेत.

सिनेजगत

‘शिळ्या कडीला ऊत’ ! शोएब अख्तरकडून अभिनेत्री सोनाली बेंद्रेबाबत धक्‍कादायक ‘गौप्यस्फोट’

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

Video : ‘तशा’ अवस्थेत नृत्य करून प्रियंका चोपडाने ‘हॉटनेस’च ‘दर्शन’ दिल्याने वातावरण ‘टाईट’

 

 


You might also like