अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडून जीएसटीत कपातीचे संकेत

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था

जीएसटीच्या वर्षपूर्तीनिमित्‍त जीएसटीबद्दल केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी समाधान व्यक्‍त केले असून त्यांनी यापुढे जीएसटीच्या स्लॅबमध्ये आणखी कपात करून सरकार नागरिकांना मोठया प्रमाणात दिलासा देणार असल्याचे संकेत दिले आहेत. जीएसटीमुळे देशात एकंदरीत अप्रत्यक्षपणे करांची गुंतागुंत संपलेली आहे. किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रियेनंतर प्रथमच जेटीली यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d3abfc5f-7d1c-11e8-ba37-d7251a49324a’]

करसंकलनात जीएसटीमुळे कमालीची वाढ झाली आहे तर दुसरीकडे आवश्यक वस्तू आणि सेवांवरील कर कमी झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा देखील मिळाला आहे. अ‍ॅडव्हान्स टॅक्स पेमेंटमुळे एकंदरीत उत्पन्‍नात वाढ देखील झाली आहे. आता जीएसटीमुळे देश संघटित बाजारपेठ बनला असल्याचेही जेटली यावेळी म्हणाले. गतवर्षी जुलै महिन्यात मोदी सरकारने देशातील सर्वात मोठी गुंतागुंतीची कर प्रणाली संपुष्टात आणली होती. त्यावेळी 13 मल्टीपल टॅक्स आणि 5 मल्टिपल कर परतावे अंमलात होते.

टॅक्सवर टॅक्स लागून नागरिकांसह व्यापारी परेशान होत होते. प्रत्येक राज्याचे स्वतःचे वेगवेगळे कर दर असल्याने त्यानुसार कर परतावा फाईल होत होता. देशाची संघराज्य पध्दतीची रचना लक्षात घेवुन मोदी सरकारने ही करप्रणाली तयार केली असल्याचेही जेटली म्हणाले. एकंदरीत अर्थमंत्रयांनी जीएसटीत आणखी कपात होणार असल्याचे संकेत दिल्याने व्यापारी आणि नागरिकांकडून समाधान व्यक्‍त करण्यात येत आहे.