जगातील सर्वात ‘पावर’फुल महिलांच्या यादीत निर्मला सीतारमण यांचा समावेश, ‘महाराणी’ क्वीन एलिजाबेथ यांना सोडलं मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या पहिल्या महिला अर्थ मंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) जगातील 100 सर्वात जास्त ताकदवान महिल्यांच्या यादीत समाविष्ट झाल्या आहेत. या यादीत निर्मला सीतारमण यांनी 34 वा क्रमांक मिळवला आहे.

जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल (German Chancellor Angela Merkel) यांनी सातत्य राखत सलग नवव्या वर्षीही फोर्ब्सच्या (Forbes List 2019) मोस्ट पावरफुल वुमन (World’s most powerful women of 2019)च्या यादीत टॉपवर राहण्याचा मान कायम राखला आहे. भारतातून पुन्हा एकदा औषध कंपनी बायोकॉन (Biocon)च्या एमडी आणि सीईओ किरण मजुमदार शॉ (Kiran Majumdar Shaw) यांनाही या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. याशिवाय आता निर्मला सीतारमण यांना पहिल्यांदाच या यादीत स्थान मिळालं आहे. त्यांनी ब्रिटनची महाराणी क्वीन एलिजाबेथ यांना मागे टाकत 34 वा क्रमांक मिळवला आहे.

‘या’ महिलांचा यादीत पहिल्यांदाच समावेश
या यादीतील एकूण 23 महिला अशा आहेत ज्यांना या यादीत पहिल्यांदाच स्थान देण्यात आलं आहे. यात आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिवा, पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग, वॉलमार्ट इंटरनॅशनलच्या अध्यक्षा आणि सीईओ आणि भारत सरकारच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारमण आणि पॉप सिंगर आणि गीतकार रिहाना यांच्या नावांचा समावेश आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/