FM निर्मला सीतारामन यांची घोषणा ! ‘कोरोना’ संकटात प्रोत्साहन खर्चात करणार नाही कपात, अर्थव्यवस्था सांभाळण्यात होईल मदत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, कोरोना संकटामुळे तयार झालेले सध्याचे वातावरण पहाता खर्चात कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटले की, केंद्र सरकार कोरोना संकटात वाढत्या वित्तीय तुटीनंतरही खर्च जारी ठेवणार आहे. सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी खर्चात वाढ करू शकते. यासाठी बजेट तोट्यात वाढीची चिंता केली जाणार नाही. एका मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले की, सरकार घाईगडबडीत प्रोत्साहन पॅकेजमध्ये घट करण्याचा कोणताही निर्णय घेणार नाही.

सरकारी कंपन्या वाढवत राहतील भांडवली खर्च

अर्थमंत्री सीतारामन यांच्यानुसार, सर्व सरकारी कंपन्यांनी भांडवली खर्च वाढवत राहावे. सध्याच्या स्थितीत खर्च वाढवण्याची आवश्यकता आहे. सोबतच त्यांनी म्हटले की, फिस्कल डेफिसिटबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही. नोव्हेंबर 2020 मध्ये कोरोनाने वाईटप्रकारे प्रभावित कंपन्यांना उभे करणे आणि रोजगार वाचवण्यासाठी सरकारने अर्थव्यवस्थेच्या 15 टक्के बरोबरीचे मदत पॅकेज दिले. या निर्णयामुळे 2020-21 च्या अखेरपर्यंत बजेट तूट वाढून जीडीपी 8 टक्केपर्यंत पोहचू शकतो. हा तोटा ठरवलेल्या 3.5 टक्के लक्ष्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त आहे.

सीतारामन यांनी म्हटले की, तात्काळ खर्चात एखाद्या कपातीबाबत विचारही केला जाऊ शकत नाही. सध्या खर्चात संतुलन कायम ठेवणे आवश्यक आहे. कारण, इकॉनॉमीत आलेली रिकव्हरी कायम राखणे आवश्यक आहे. सरकारच्या पावलांमुळे इकॉनॉमीत रिकव्हरी दिसू लागली आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीदरम्यान जीडीपीत विक्रमी 24 टक्केच्या दराने घसरणीनंतर दुसर्‍या तिमाहीत सुद्धा जबरदस्त घसरणीची शक्यता होती. मात्र, केंद्र सरकारच्या प्रयत्नाने दुसर्‍या तिमाहीदरम्यान जीडीपीत 7.5 टक्केच्या दराने घट आली. याशिवाय काही सेक्टर्समधून वाढीचे संकेत सुद्धा मिळाले आहेत. यातून स्पष्ट होते की, इंडियन इकॉनॉमीत लागोपाठ सुधारणा होत आहे.