‘हिंदी-इंग्रजी’सह १३ स्थानिक भाषांमधून होणार बँकेच्या परिक्षा : अर्थमंत्री निर्मला सीमारमण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जे उमेदवार बँकिंगच्या स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे कारण बँकिंग परिक्षांचे आयोजन आता स्थानिक भाषांमध्ये होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी याबाबतची घोषणा केली. त्यांनी लोकसभेत बोलताना सांगितले की, दक्षिण भारतातील राज्यातील खासदारांनी मागणी केली होती की बँक भरतीच्या परिक्षा स्थानिक भाषांमध्ये असाव्यात. आता त्यांची मागणी पूर्ण करण्यात आली आहे.

हा मुद्दा राज्यसभेत काँग्रेसचे खासदार जी. सी. चंद्रशेखर यांनी मांडला होता. यावेळी त्यांनी कन्नड भाषेत बोलून आपला मुद्दा मांडला, ते म्हणाले की, भारतीय बँकिंग परिक्षा आणि अन्य भरतीच्या परिक्षा स्थानिक उमेदवारांच्या सुविधेसाठी इंग्रजी, हिंदी बरोबरच स्थानिक भाषेत देखील घेण्यात याव्यात ज्यामुळे परिक्षा देणाऱ्या उमेदवारांना सहाय्य मिळेल.

चंद्रशेखर यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर सीतारामण यांनी यावर उत्तर देताना सांगितले की लोकसभेतील खासदारांनी देखील या मुद्यावर बैठक घेतली होती. त्यांनी आश्वासन दिले होते की या प्रकरणावर लवकर निर्णय घेण्यात येईल. तर आज त्यांनी घोषणा केली की, १३ स्थानिक भाषांमध्ये बँकिंग परिक्षेचे आयोजन करण्यात येईल. याआधी परिक्षेचे आयोजन हिंदी आणि इंग्रजीत घेण्यात येत होत्या. आता या निर्णयानंतर महाराष्ट्रातील विद्यार्थी बँकिंगची परिक्षा मराठीत देखील देऊ शकतील.

 

नियमित व्यायाम केल्यास होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

रंगांचा मानवी जीवनावर पडतो सखोल प्रभाव, जाणून घ्या सत्य

धक्कदायक : बौद्धांना मदत केल्यास १०हजार रु. दंड ठोठवणार, गावात दवंडी देत जातीयवाद्यांनी टाकला बहिष्कार

काँग्रेसचे आमदार अमिता चव्हाणांच्या मतदार संघातच काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन