ब्लॅक फंगसचे औषध टॅक्स फ्री, कोरोना व्हॅक्सीनवर 5% GST कायम; ऑक्सीजन सुद्धा स्वस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाशी Corona संबंधीत साहित्यावर मंत्री गटाच्या शिफारसी आज GST कौन्सिलने स्वीकारल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन Finance Minister Nirmala Sitharaman यांच्या अध्यक्षते खालील जीएसटी कौन्सिलने ब्लॅक फंगसचे Black Fungus औषध टॅक्स फ्री करण्यास मंजूरी दिली. तर कोरोनाशी संबंधीत इतर वस्तूंचे दर कमी केले.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

कोरोना व्हॅक्सीनवर 5% जीएसटी कायम
जीएसटी GST कौन्सिलने कोरोना व्हॅक्सीनवर Corona Vaccine 5% जीएसटी कायम ठेवला आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत निर्मला सीतारमन यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकार Central Government 75% कोरोना व्हॅक्सीनची खरेदी करत आहे. त्यावर जीएसटी सुद्धा देत आहे, परंतु ती सरकारी हॉस्पिटलच्या Government Hospital माध्यमातून सामान्य जनतेला मोफत दिली जाईल तेव्हा याचा जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही.

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 459 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

Tocilizumab Am¡a Amphotericin B औषध टॅक्स फ्री
देशात ब्लॅक फंगसची वाढती प्रकरणे पाहता कौन्सिलने याच्या उपचारात वापले जाणारे Amphotericin B औषधावर जीएसटी शून्य केला आहे.
तर Tocilizumab वर सुद्धा टॅक्स झीरो केला आहे. तर Remdesivir आणि इतर अँटी-कॉग्लँट औषधे जसे की, Heparin वर जीएसटीचा GST दर 12% वरून कमी करून 5% केला आहे.

ऑक्सीजनपासून टेस्टिंग किटपर्यंत या वस्तू स्वस्त
जीएसटी कौन्सिलने कोरोनाशी संबंधीत इतर मदत साहित्यावर सुद्धा कराचा दर कमी केला आहे.
मेडिकल ग्रेड ऑक्सीजन, ऑक्सीजन कंन्सट्रेटर Concentrator, व्हेंटिलेटर Ventilator, बायपॅप मशीन, हाय फ्लो नेसल कॅनुला ( HFNC ) आणि कोविड टेस्टिंग किट आता स्वस्त होतील.
कौन्सिलने यावर टॅक्सचा दर 12% वरून कमी करून 5% केला आहे.
सोबतच हँड सॅनिटायजर Hand sanitizer आणि थर्मामीटरवर सुद्धा जीएसटी 5% केला आहे.
यामुळे ग्राहकांना थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी-चिंचवड शहरात आज 442 जण ‘कोरोना’मुक्त, 240 नवीन रुग्णांची नोंद

अ‍ॅम्ब्युलन्स नाही आता लक्झरी आयटम
जीएसटी व्यवस्थेत वाहन आणि इतर लक्झरी आयटमवर 28% च्या दराने टॅक्स लागत होता.
परंतु कोरोनाची स्थिती पाहता जीएसटी कौन्सिलने अ‍ॅम्ब्युलन्सला या श्रेणीच्या बाहेर काढले आहे.
आता अ‍ॅम्ब्युलन्सवर 28% ज्या ऐवजी 12% जीएसटी लागेल.
मात्र, ही सूट सप्टेंबरपर्यंतच मान्य राहील.

उद्यापर्यंत येईल नोटिफिकेशन
जीएसटी कौन्सिलने कोरोनाशी संबंधीत मदत साहित्य, ब्लॅक फंगसचे औषध आणि अ‍ॅम्ब्युलन्स इत्यादीवर कराचा दर 30 सप्टेंबर 2021 पर्यंतच कमी केला आहे.
हे नवीन दर नवीन तयार झालेल्या सामानासाठी असतील.
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटले की, याच्याशी संबंधीत अधिसूचना उद्यापर्यंत जारी होईल.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली बैठक
जीएसटी कौन्सिलची ही 44वी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी अर्थमंत्री निर्मला सीतारमन होत्या तर त्यांच्यासोबत अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर Anurag Thakur आणि अर्थ मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री, केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा सहभागी झाले होते.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :  finance minister nirmala sitharaman chairs 44th gst council meeting via video conferencing in new delhi with anurag thakur

हे देखील वाचा

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा