कॉर्पोरेट टॅक्स घटल्यानं सर्वसामान्यांना होणार ‘हे’ 4 फायदे, स्वस्त होणार ‘या’ वस्तू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी भारतात कॉर्पोरेट करात मोठ्या प्रमाणात कपात करण्याची घोषणा केली आहे. सरकारचा कॉर्पोरेट कर २५.१७ टक्क्यांपर्यंत कमी केल्याने कंपन्यांसह सर्वसामान्यांवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे नोकरी क्षेत्रात विस्मयकारक बदल होईल. कारण, कंपन्या सणाच्या हंगामापूर्वी आपल्याकडील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू शकतात. ग्राहक, रिटेल, औद्योगिक उत्पादन, बांधकाम अशा क्षेत्रात नफा असलेल्या कंपन्या अधिकाधिक लोकांना कामावर घेऊ शकतात. तसेच दबावाखाली असलेल्या ऑटो- पार्ट्स कंपन्यांनाही दिलासा मिळणार आहे.

१. सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल
एस्कॉर्ट सिक्युरिटीचे संशोधन प्रमुख आसिफ इक्बाल यांनी आज सांगितले की, २००८-०९ च्या मंदीच्या काळात खर्च आणि खप वाढवण्यासाठी आर्थिक पॅकेज देण्यात आले होते, परंतु या वेळचे हे पॅकेज मागील वेळेपेक्षा वेगळे आहे. कारण आता थेट कंपन्यांचा नफा वाढेल, मग ते उत्पादनांची किंमत कमी करतील आणि मागणी वाढेल.

२. गुंतवणूकदारांना मिळणार जास्तीचा लाभांश
आसिफ म्हणाले की काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना अधिक लाभांश देऊ शकतात.

३. मीडिया रिपोर्टनुसार 
मागणी वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सरकार लवकरच आयकर संबंधित पावले उचलू शकते अशीही चर्चा आहे. थेट करांवर बनवलेल्या समितीने कॉर्पोरेट आणि उत्पन्न या दोन्ही करांच्या दरात बदल करण्याची शिफारस केली.

४. आता नोकर्‍या जाणार नाहीत, तर संधी वाढतील 
विवेक मित्तल, रिसर्च हेड, व्हीएम पोर्टफोलिओ म्हणतात की गेल्या काही तिमाहीत नोकरीचे बाजार मंदावले आहेत. विशेषत: दोन दशकांहून अधिक काळानंतर ऑटोसारख्या क्षेत्राला मंदीचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे बर्‍याच कंपन्यांनी काम बंद केले आहे. परंतु कॉर्पोरेट कर कपातीमुळे व्यवसायाची वाढ होईल. अशा परिस्थितीत अधिक रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

५. अन्य ठिकाणच्या कॉर्पोरेट करांचे दर 
कंपन्यांवरील करामध्ये मोठ्या प्रमाणात कपात केल्याने भारताला जागतिक सरासरीच्या (२३.७९%) जवळ आणले आहे. आशियाविषयी बोलताना, येथे सरासरी २१.०९% कॉर्पोरेट टॅक्स आहे. अशा परिस्थितीत आता चीनला प्रोडक्शन हब म्हणून पुढे जाणाऱ्या कंपन्यांना भारत आकर्षित करेल. वर्षी थायलंडने चीनमधून शिफ्ट होत असलेल्या कारखान्यांसाठी कॉर्पोरेट कर कमी करून १०% केला.