भ्रष्टाचार प्रकरणी 10000 बँक कर्मचारी ‘गोत्यात’, मोदी सरकारची कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकरानं भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लगाम लावायला सुरुवात केली आहे. जेणेकरून जनतेला अडचणींचा सामना करावा लागू नये. बँकेतून 1 लाखांहून जास्त कर्ज देताना होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर कठोर कारवाई केली आहे. 2015 ते 2017 दरम्यान 10000 बँक कर्चमचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात नोटबंदीचा कालावधीही समाविष्ट आहे जेव्हा बँकेत सर्वाधिक भ्रष्टाचार झाला होता. खासदार अन्नपूर्णा देवी आणि रमा देवी यांच्या प्रश्नावर अर्थमंत्र्यांनी लोकसभेत हे उत्तर दिलं. त्यांनी असंही सांगितलं की, बँकेतील फ्रॉड रोखण्यासाठी सरकारनं दोन वर्षांत एकूण 3.38 लाख बँक खाती बंद केली आहेत.

नेमकं प्रकरण काय ?
खासदार अन्नपूर्णा देवी आणि रमा देवी यांनी विचारलं होतं की, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कर्ज देताना जो भ्रष्टाचार होतो त्यावर एखाद्या अधिकाऱ्यावर काही कारवाई केली आहे का ? यावर उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, “भारत रिझर्व बँकेकडून उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 2015 मध्ये 4641, 2016 साली 3232 आणि 2017 मध्ये 2107 बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. हे कर्मचारी 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्तीच्या रकमेत झालेल्या भ्रष्टाचारात सहभागी होते.

निर्मला सीतारमण म्हणाल्या, “सध्याच्या आर्थिक वर्षातील पहिल्या 6 महिन्यात सुमारे 95760 कोटी रुपयांची बँक फ्रॉडची प्रकरणं समोर आली आहेत. एप्रिल-सप्टेंबरमध्ये एकूण 5743 फ्रॉड संदर्भातील प्रकरणांची नोंद झाली आहे. बँकेतील फ्रॉड थांबवण्यासाठी सरकारनं मोठी पावलं टाकली आहेत. यात गेल्या 2 आर्थिक वर्षांत 3.38 लाख बँक खाती बंद करण्यात आली आहेत.”

Visit : Policenama.com