पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवर अर्थमंत्री सीतारामन यांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाल्या…

नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली जावी, अशी मागणी केली जात आहे. त्यावर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्या म्हणाल्या, सरकारसमोर धर्मसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात कधी केली जाणार असा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या, आम्ही देशातील ग्राहकांची गरज जाणून आहोत. मात्र, याप्रकरणात सरकारसमोर एक धर्मसंकटाची परिस्थिती आहे. अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे, असे संकेत मिळत आहेत. मात्र, सीतारामन या ज्या धर्मसंकटावर बोलत आहेत. त्या वास्तविक हेच की तेलाच्या किमती बाजारावर आधारित आहेत. म्हणजेच त्याच्या किमती आता तेल कंपन्या ठरवतात. तर दुसऱ्या बाजूला कोरोना काळात महसूलातील संग्रहात येणाऱ्या कमीवर लक्ष ठेवता सरकारला टॅक्समध्ये कपात करणे कठीण आहे.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, आम्ही भारतीय तरुणांवर लक्ष्य केंद्रित करू इच्छित आहोत. ज्याचा उल्लेख आम्ही बजेटमध्ये केलाही आहे. आमचे बजेट येत्या 20 वर्षांवर लक्ष ठेवून बनवण्यात आले आहे.

पेट्रोल-डिझेलचा GST मध्ये समावेश होणार?

पेट्रोल-डिझेलचा GST मध्ये समावेश होणार का? हे विचारल्यावर निर्मला सीतारमन यांनी सांगितले, की यासंदर्भात GST कौन्सिल विचार करू शकते. तसेच मी अनेक पक्षांच्या नेत्यांशी बोलत आहे. अनेक कारखाने पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. आता ते विस्तार करण्याच्या विचारात आहेत. सध्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे.