अर्थमंत्री निर्मला सीतारमण SBI वर भडकल्या, म्हणाल्या – ‘निर्दयी बँक, असं नाही चालणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा एक ऑडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अधिकाऱ्यांना फटकारत आहे. वास्तविक, ऑडिओनुसार, लोकांच्या समस्या ऐकून अर्थमंत्री हैराण होतात आणि त्यानंतर त्यांचा राग बँकेवर निघतो. निर्मला सीतारमण यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये त्या एसबीआयला फटकारत बँकेला ‘निर्दयी बँक’ म्हणत आहेत. ज्या कार्यक्रमात अर्थमंत्र्यांनी बँकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेथे एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार आणि विविध बँकांचे प्रमुखही उपस्थित होते.

२७ फेब्रुवारी रोजी जेव्हा एसबीआयच्या फाइनान्शिअल आउटरिज कार्यक्रमात भाग घेण्याच्या संदर्भात अर्थमंत्री गुवाहाटीला गेल्या होत्या त्यावेळी ही घटना घडली. त्याचवेळीची ही ऑडिओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये सीतारामन चहा बाग कामगारांना कर्ज मिळविताना येत असलेल्या अडचणीमुळे संतप्त आहेत. त्या म्हणाल्या कि, “तुम्ही सर्वात मोठी बँक आहात, असे मला सांगू नका. तुम्ही निर्दयी बँक आहात. एसएलबीसी यासारखेकार्य करत नाहीत.”

ऑडिओ क्लिपमध्ये निर्मला सीतारमण एसबीआयला निर्दयी आणि अकार्यक्षम म्हणत आहेत. अर्थमंत्री पुढे म्हणतात कि, बँक आपले काम योग्य प्रकारे करीत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी चहा बागेत काम करणार्‍यांबद्दलही गंभीर आहेत, परंतु येथे ज्या प्रकारे हे घडत आहे ते योग्य नाही. तसेच खाती लवकरात लवकर कशी कार्यान्वित केली जातात ? असा प्रश्न अर्थमंत्र्यांनी यावेळी उपस्थित करत ही खाती कार्यान्वित करण्यासाठी बँकेला आरबीआयच्या काही मंजुरीची आवश्यकता असते, आणि हे एका आठवड्यात होऊन जाईल, असेही यावेळी त्या म्हणाल्या.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या कि, मला फसवू नका. एसबीआय अध्यक्ष, या संदर्भात तुम्ही मला दिल्लीत भेटा. हा पूर्णपणे निष्काळजीपणा आहे. या अकार्यक्षमतेसाठी मी तुला पूर्णपणे जबाबदार धरत आहे आणि मी याबद्दल तुमच्याशी सविस्तरपणे चर्चा करेन. तुम्ही खाती सुरू करा आणि तुमच्यामुळे चहाच्या बागातील कोणत्याही कामगारांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्या.

दरम्यान, सुमारे अडीच लाख चहा लागवड कामगारांची बँक खाती कार्यरत नसल्याचे समजते. याशिवाय मी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरशी बोलणार असल्याचे निर्मला सीतारमण म्हणाल्या. या कार्यक्रमात आसामचे अर्थमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्याशिवाय अनेक ब्यूरोक्रॅट्स उपस्थित होते.