‘हा’ आहे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र्र राज्याचा २०१९-२० वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प आज बुधवारी विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अंतरिम अर्थ संकल्पाचे वाचन केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. तर जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

रस्ते आणि दळणवळण
-महाराष्ट्रात ४६६६ किमी लांबीपासून २१,४७३ किमी राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्यात आले आहेत.
-मुंबई मेट्रो ११.४ किमीपासून २७६ किमी पर्यंत वाढवण्या आले आहे.
– राज्याच्या लहान शहरात विमान सेवेची सुरुवात करण्यावर भर
– अमरावती, गोंदिया, नाशिक, चंद्रपूर, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विमानतळ विकास मोहिम वेगात.
– ८५०० कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रस्त्यांसाठी प्रस्तावित
– मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत ३० हजार किमीचे उद्दिष्ट, यापैकी २२ हजार किमीच्या रस्त्यांना मंजूरी
– समृद्धी महामार्गासाठी ७ हजार कोटींचे भूसंपादन पूर्ण
– नाशिकमध्ये लाईट रेल ट्रान्सपोर्टसाठी काम सुरु करण्यात आले आहे
– हायब्रीड ॲन्युईटी तत्त्वावर रस्त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ३ हजार ७०० कोटींची तरतूद

कृषी विभाग
-शेतीवरील विविध योजनांसाठी ३हजार ४९८ कोटी रुपयांचा निधी
-शेतीतील सौर पंपांच्या योजनेसाठी ९० कोटी
-एक लाख सौर पंप बसवण्याचे सरकारने ठेवले उद्दिष्ट
-१५१ दुष्काळी तालुके आणि २६८ महसूल मंडळे,५४४९ गंभीर दुष्काळी गावांना मदत पोहचवली जाणार
-सहकारी संस्थांच्या कृषी व कृषीपूरक व्यवसायाला सहाय्य करण्यासाठी ५०० कोटींच्या अनुदानाची तरतूद
शेतकरी, उद्योजक, यंत्रमागधारकांना विजेच्या दरात सवलत देण्यासाठी ५ हजार २१० कोटींची तरतूद

रोजगार
-देशातील रोजगार निर्मितीत महाराष्ट्राचा वाटा २५ टक्के
-२० लाख ६० हजार तरुणांना नोकऱ्या
-हायब्रीड एनयूटी अंतर्गत ३ हजार ५०० कोटी मंजूर
-अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीजनिर्मिती करण्यावर भर यासाठी १ हजार ८७ कोटींची तरतूद
– अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल ४०० कोटींनी वाढवणार
– इलेट्रॉनिक क्षेत्रात ६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक. १२ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित

ग्रामीण विकास
-मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी ७५० कोटी रुपयांची तरतूद

शहरी विकास
– पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३८५ शहरात नागरिकांना लाभ होणार यासाठी ६८९५ कोटीची तरतूद
– स्मार्ट सिटी अभियानात पुणे, सोलापूर, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, -पिंपरी-चिंचवड या८ शहरांसाठी यंदा दोन हजार ४०० कोटींची तरतूद
-मेक इन इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात ३ लाख ३६ हजार कोटींची थेट परदेशी गुंतवणूक
-माहिती तंत्रज्ञ उद्योगातून १ हजार ५०० कोटींची गुंतवणूक अपेक्षित त्यातून १ लाख रोजगार निर्मितीची शक्यता

एसटी महामंडळ
-एसटी बसच्या माध्यमातून ६७ लाख प्रवासी रोज प्रवास करतात
-९६ बस स्थानकासाठी २७० कोटी रुपयांची तरतूद
-बस खरेदीला वेग

महाराष्ट्रा वरील कर्जाचा तपशील
– सध्या राज्यावर ४लाख १४ हजार कोटींचे कर्ज आहे
– राज्याचे कर्ज १६ टक्क्यांवरुन १४ टक्क्यांवर आणल्याचा सरकारचा दावा