‘या’ बँकेचे खाजगीकरण होणार नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे खाजगीकरण करण्यात येणार नाही. परंतु यांचे विलीनीकरण सुरु राहिल. क्षेत्रीय ग्रामीण बँकेची सध्या असलेली ५६ इतकी संख्या कमी करून ३६ करण्याचा सरकारचा मनोदय आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत ही माहिती दिली. परंतु एका राज्यात असलेल्या क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे (RRB) विलीनीकरण करण्यात येईल.

बँकेचा खर्च कमी करण्यासाठी हे विलीनीकरण करण्यात येईल. तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, भांडवलाच्या पायावर आणि बिजनेसच्या दृष्टिकोनातून बँकेचा विकास करण्यासाठी हे बदल करण्यात येत आहे. गेल्या चार वित्तीय वर्षात सरकारी बँकांनी ३.०९ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रिकव्हरी केली आहे. अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, सरकारी बँकेत सुधारणा घडवून आणण्यासाठी कर्जाच्या वसुलीवर जोर देण्यात आला आहे.

क्षेत्रीय ग्रामीण बँक म्हणजे काय ?
गांधी जयंतीच्या मुहूर्तावर २ ऑक्टोबर १९७५ रोजी ५ कोटी भाग भांडवल असलेली पहिली RRB (reginal rural bank) सुरु करण्यात आली. एक वर्षानंतर याच दिवशी आणखी ५ RRB सुरु झाल्या. त्यांचे एकत्रित भाग भांडवल १०० कोटी रुपये होते. सुरुवातीच्या काळात या बँकांचा विस्तार फार झपाट्याने झाला. बँकांची संख्या वाढली, वेगवेगळ्या राज्यात त्या सुरु झाल्या आणि त्यांच्या शाखांचीही संख्या वाढली. १९८५ सालच्या अखेरीस RRB च्या १२,६०६ शाखा होत्या. त्यांचे ऋण ठेव प्रमाण १६५% इतक्या उच्च पातळीवर होते. ग्रामीण गुण वैशिष्ट्ये असलेली, स्थानिक वाटणारी आणि गरीब जनता केंद्री अशी ओळख ठेवून कमी परिव्यय असणारी बँक म्हणजे क्षेत्रीय ग्रामीण बँक होय. अशी प्रत्येक बँक कोणत्या तरी सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने प्रायोजित करणे अपेक्षित असले तरी प्रत्येक RRB स्वतंत्र आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावी याचा आग्रह होता.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

गर्भावस्थेत प्रवास करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

तुळशीची पाने उकळत्या दुधामध्ये घालून त्याचा सेवन करणे ‘लाभदायक’