केंद्र सरकारच्या अर्थ विभागानं ‘या’ पदाच्या नोकरीसाठी अर्ज मागवले, २.२५ लाख पगार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थ मंत्रालयाने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदासाठी अर्ज मागवले असून विरल आचार्य यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर हे पद खाली झाले आहे. या पदावर या व्यक्तीची तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्या पुनर्नियुक्तीचा विचार केला जाईल.

या पदासाठीची योग्यता
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये या पदासाठी आवश्यक असणाऱ्या अटी आणि पात्रतांची माहिती देण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय हे २४ ते ६० वर्षांच्या आत असावे. त्याचबरोबर उमेदवाराला पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये काम केल्याचा कमीतकमी २५ वर्षाचा अनुभव असायला हवा. त्याचबरोबर भारतातल्या किंवा भारताबाहेरच्या अर्थ संस्थांमधील देखील २५ वर्षांचा अनुभव असायला हवा.

इतका पगार मिळणार
प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये या पदासाठी सव्वादोन लाख रुपये मानधन मिळेल असे सांगण्यात आले आहे. १९ ऑगस्ट हि या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

आरोग्यविषयक वृत्त –