नवीन व्यावसायिकांसाठी मोदी सरकारनं बनवला सोपा ‘मार्ग’, फक्त 3 दिवसांमध्ये होणार ‘हे’ मोठं काम

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – केंद्र सरकार नवीन व्यवसाय सुरू करणार्‍यांना मदत करत आहे. मुद्रा लोनसारख्या योजनेतून कर्ज घेऊन लोक त्यांचे स्वप्न सत्यात साकारु शकतात. आपला स्वतःचा व्यवसाय तयार करण्यासाठी, आपल्याला आता अवघ्या तीन दिवसात व्यवसायाचा जीएसटी क्रमांक मिळेल. म्हणजेच, केवळ तीन दिवसाच्या नवीन व्यवसायाची नोंदणी होईल.

आपला व्यवसाय उभा करा
डिजिटल इंडियाच्या या युगात कोणालाही आपला व्यवसाय तयार करायचा असेल तर सरकार अशा लोकांची सर्व प्रकारे मदत करण्यास तयार आहे असे सरकारचे म्हणणे आहे. तीन दिवसांत व्यवसायाची जीएसटी नोंदणी करणेदेखील याचे एक पाऊल आहे. यासाठी केवळ व्यावसायिकाला त्याचे आधार कार्ड द्यावे लागेल.

तीन दिवसांत जीएसटी नोंदणी
अर्थ मंत्रालयाने सांगितले की, जीएसटी नोंदणी आधारद्वारे नवीन व्यवसायांना देण्यात येऊ लागली आहे, जे व्यापारी आपला 12 आकडी आधार क्रमांक देतील, त्यांच्या व्यवसायाला अवघ्या तीन दिवसांत जीएसटी क्रमांक मिळेल. परंतु जे अर्जदार एकत्रितपणे आधार कार्ड देणार नाहीत त्यांना फिजिकल पडताळणीनंतरच जीएसटी क्रमांक मिळेल.

आधार नसेल तर 21 दिवसापर्यंत पहावी लागणार वाट
वित्त मंत्रालयाचे म्हणणे आहे की, जे व्यापारी त्यांच्या व्यवसायाच्या पडताळणीसाठी आधार प्रमाणीकरणाचा पर्याय निवडणार नाहीत, त्यांना जीएसटी नोंदणीसाठी 21 दिवस प्रतीक्षा करावी लागेल, जर त्यांना जीएसटी क्रमांक मिळण्यासाठी काही सूचना दिल्या गेल्या तर जास्त वेळ वाट पाहावी लागू शकते.

बनावट कंपन्यांवर नियंत्रण ठेवले जाईल
या नवीन यंत्रणेद्वारे बनावट कंपन्यांवर नियंत्रण असेल, असा सरकारचा विश्वास आहे. याशिवाय आधारच्या मदतीने ऑथेंटिकेशन मिळाल्यास प्रामाणिक करदात्याला मदत होईल. अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे की, आधार प्रमाणीकरणाद्वारे जीएसटी नोंदणीच्या निर्णयामुळे व्यवसाय करण्याच्या सुलभतेला वेग येईल.

जीएसटीद्वारे काम होईल सोपे
वित्त मंत्रालयाने सांगितले की, जीएसटी लागू झाल्यानंतर करदात्यांचा आधार दुप्पट झाला आहे. सुरुवातीला जीएसटी अंतर्गत व्यवसाय सुमारे 65 लाख होते, आता ही संख्या वाढून 1.24 कोटी झाली आहे. वित्त मंत्रालयाने सांगितले की, जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना मोठा फायदा झाला. वर्षाकाठी 40 लाख रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यवसायांना जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे 27 ऑगस्ट रोजी जीएसटी परिषदेची 41 वी बैठक होणार आहे.