सरकारी कर्मचार्‍यांची दसर्‍यापुर्वीच दिवाळी ! ‘या’ कारणामुळं सप्टेंबर महिन्याचा पगार मिळणार 5 दिवस अगोदर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना या महिन्यात वेतन पाच दिवस आधी मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात सर्व विभागांना तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे या महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 25 सप्टेंबर रोजी वेतन मिळणार आहे. या आर्थिक वर्षात पहिल्यांदा कर्मचाऱ्यांना महिना पूर्ण होण्याच्या पाच दिवस अगोदर वेतन मिळणार आहे. तसेच बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे देखील सरकारने हा निर्णय घेतला आहे.

26 आणि 27 सप्टेंबर रोजी संप
सर्व बँकानी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी संपावर जाण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी शनिवार आणि 29 सप्टेंबर रोजी रविवार येत असल्याने या दोन दिवशी देखील कामकाज होणार नाही.

अर्थ मंत्रालयाने दिले आदेश
अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबरला सर्व कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. दरवेळी 30 तारखेला वेतन होत असते. मात्र यावेळी बँकांच्या संपांमुळे यावेळी पाच दिवस आधी वेतन होणार आहे.

Visit – policenama.com 

You might also like