बँक खाते आणि KYC साठी धर्माविषयी माहिती देण्याची गरज नाही : सरकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थ मंत्रालयाच्या आर्थिकसेवा विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी म्हटले आहे की, कोणत्याही व्यक्तीला बँकेच्या केवायसीसाठी धर्मासंबंधी माहिती देण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी काही माध्यमांनी लवकरच सरकार केवायसीसाठी धर्माची माहिती मिळवण्याची व्यवस्था करू शकते, असे म्हटले होते.

राजीव कुमार यांनी म्हटले की, कोणत्याही व्यक्तीला बँक खाते उघडताना अथवा बँक खात्यासाठी केवायसी देताना धर्माविषयी माहिती द्यावी लागणार नाही.

लवकरच केवायसी फॉर्म भरण्यासाठी धर्मसंबंधी माहिती द्यावी लागेल असे काही माध्यमांनी म्हटले होते. माध्यमांनी म्हटले होते की भारतीय रिझर्व बँकेने फेमा अ‍ॅक्ट रेग्युलेशन केला आहे, ज्याच्यानंतर धर्माची माहिती अनिवार्य होणार आहे. यामध्ये एनआरओ खाते उघडण्यासाठी आणि मुस्लिमांसह अन्य अल्पसंख्याक लोकांना संपत्ती धारण करण्यास मदत होऊ शकते.

असे म्हटले जात होते की, आरबीआयच्या संशोधनानंतर या नियमात नास्तिक आणि मुस्लिम प्रवासी सहभागी होणार नाहीत. तसेच म्यानमार, श्रीलंका आणि तिबेटहून येणारे प्रवासीसुद्धा यात सहभागी होणार नाहीत.

फेमा डिपॉझिट रेग्युलेशन संशोधन
माध्यमांच्या या वृत्तात म्हटले होते की, जर कुणी व्यक्ती पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानहून भारतात येऊन दिर्घ मुदतीच्या वीजावर रहात आहे आणि ती व्यक्ती या देशात धार्मिक अल्पसंख्याकामध्ये येत असेल तर भारत सरकार त्यास केवळ एक एनआरओ खाते उघडण्यास परवानगी देईल. जेव्हा त्या व्यक्तीस नागरिकत्व कायदा १९५५ नुसार भारतीय नागरिकत्व दिले जाईल, तेव्हाच या एनआरओ खात्यास निवासी खात्यात रूपांतरित केले जाईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/