१ जुलैपासुन दैनंदिन जीवनातील ‘या’ ६ गोष्टींमध्ये होणार बदल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १ जुलैपासून तुमच्या दैनंदिन आयुष्यात मोठा फरक जाणवणार आहे. बँक, घरगुती गॅस आणि दैनंदिन आयुष्यातील गोष्टींचा यात समावेश आहे. त्याचबरोबर आरबीआयच्या नियमांत देखील बदल होणार आहेत. ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्याचबरोबर व्याजदरात देखील घट होऊ शकते. त्यामुळे तुमची बचत होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचबरोबर दैनंदिन आयुष्यातील देखील अनेक गोष्टींवर यामुळे फरक पडणार आहे.

या सहा गोष्टीवर पडणार फरक

१)RTGS & NEFT मध्ये बदल
बँकेतून केल्या जाणाऱ्या RTGS & NEFT मध्ये १ जुलैपासून मोठा बदल आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. RTGS & NEFT यासाठी लागणारे शुल्क रद्द करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. यामुळे पैसे पाठवताना लागणारे शुल्क यापुढे लागणार नाही. याआधी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी १ रुपये ते पाच रुपयांपर्यंत शुल्क लागत होते.

२) घरगुती गॅस
१ जुलैपासून घरगुती गॅसच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे. यामुळे सामान्य माणसाच्या खिशावर याच भार पडणार आहे. याआधीदेखील १ जून रोजी गॅसच्या किमतींमध्ये वाढ करण्यात अली होती.

३) सेविंग खाते
आरबीआयने १ जुलैपासून या खात्यांविषयी महत्वाचा निर्णय घेतला आहे. बेसिक सेविंग खात्यांमध्ये आता ग्राहकांना चेकबुक आणि अन्य सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे यापूर्वी या सेवांसाठी जे शुल्क द्यावे लागत होते त्यापासून आता ग्राहकांची सुटका होणार आहे.

४) बचत व्याज होणार कमी
याचा सर्वात मोठा फटका सामान्य ग्राहकांना बसणार आहे. १ जुलैपासून आरबीआयने सामान्य बचत खात्यांवर मिळणाऱ्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF), सुकन्या योजना आणि नॅशनल सेविंग स्‍कीम या योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

५)एसबीआय चा नवीन नियम
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने आपल्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलैपासून याचा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे याचा फटका थेट ४२ कोटी ग्राहकांना बसणार आहे. एसबीआय आपल्या व्याजदरात आता रेपोरेट नुसार बदल करत राहणार आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे रेपोरेट बदलत राहतील त्याप्रमाणे एसबीआय देखील आपली व्याजदरात बदल करत राहणार आहे.

६)महिंद्रा गाड्या महागणार
१ जुलैपासून देशातील मोठी कार उत्पादक कंपनी महिंद्रा आपल्या गाड्यांच्या किमतींमध्ये वाढ करणार आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिश्यावर याचा भर पडणार आहे. जवळपास ३६ हजार रुपयांपर्यंत महिंद्रा आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवणार आहे. महिंद्रा स्कॉर्पियो, बोलेरो, एक्सयूवी ५०० यांसारख्या गाड्यांच्या किंमती वाढणार आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

शहरातील ६० टक्के नागरिक घेतात फक्त ५ तासाची झोप, मधुमेह व मेंदूविकारात वाढ

आरोग्यसेवेत केरळ नंबर १ वर, महाराष्ट्राचे स्थान कितवे ?

‘हे’ खाद्यपदार्थ सेवन केले तर कर्करोगापासून होईल संरक्षण

फुप्फुसांचा संसर्ग ठरू शकतो घातक, वेळीच ओळखा लक्षणे

Loading...
You might also like