Financial Deadlines Before 31 March | 31 मार्चपर्यंत पूर्ण करा ‘ही’ पाच कामे, अन्यथा होईल मोठे नुकसान; भरावा लागू शकतो मोठा दंड
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Financial Deadlines Before 31 March | 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष 2022 – 23 सुरू होईल. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या अगोदर 31 मार्च केवळ आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस नसून, तो अनेक आर्थिक कामे पूर्ण करण्याची सुद्धा डेडलाईन असतो. ही आर्थिक कामे पूर्ण न केल्यास पुढील आर्थिक वर्षात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला दंड लागू शकतो आणि इन्कम टॅक्सचे (Income Tax Department) अधिकारी कारागृहात (Jail) सुद्धा पाठवू शकतात. 31 मार्च 2022 पर्यंत कोणती पाच महत्वाची कामे पूर्ण केली पाहिजेत, ते जाणून घेवूयात. (Financial Deadlines Before 31 March)
1. आधार – पॅन लिंक
आधार आणि पॅन नंबर लिंक (PAN – Aadhaar Linking Deadline) करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे. अन्यथा तुमचा पॅन नंबर इनव्हॅलिड होईल. ई – फायलिंग वेबसाइट किंवा UIDPAN किंवा 567678 किंवा 56161 वर पाठवून दोन्ही लिंक करू शकता. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड (NSDL) आणि UTIITSL च्या पॅन सेवा केंद्रांद्वारे सुद्धा ऑफलाईन लिंक करू शकता.
2. बिलेटेड किंवा सुधारित आयटीआर
कोरोना महामारीमुळे आर्थिक वर्ष 2020 – 21 साठी आयटीआर भरण्याची (ITR Deadline Date) अंतिम तारीख अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 ठेवली होती. मात्र, जर तुम्ही तोपर्यंत आयटीआर फाइल करू शकला नाही, तर तुम्ही 31 मार्च 2022 पर्यंत तुमचे रिटर्न फाइल करू शकता. परंतु, विलंबित आयटी रिटर्न भरताना, करदात्यांना अतिरिक्त कर तसेच दंड भरावा लागेल. (Financial Deadlines Before 31 March)
3. बँक खाते KYC
आरबीआयने केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. चालू आर्थिक वर्ष 2021 – 22 संपेपर्यंत केवायसी अपडेट करण्यासाठी कोणतीही कारवाई करू नये, असा सल्ला आरबीआयने वित्तीय संस्थांना दिला आहे.
केवायसी अंतर्गत, बँक ग्राहकांना त्यांचे पॅन कार्ड, पत्ता जसे की आधार, पासपोर्ट इत्यादी अपडेट करण्यास सांगितले जाते. यासोबतच अलीकडची छायाचित्रं आणि इतर माहितीही मागवली जाते.
—
4. कर बचत नियोजन
जर तुम्ही आर्थिक वर्ष 2021 – 22 साठी जुन्या कर प्रणालीची निवड केली असेल, तर तुम्हाला तुमचे कर बचतीचे नियोजन 31 मार्च 2022 पर्यंत करावे लागेल. याचा अर्थ असा की करदात्याला हे पहावे लागेल की त्याने सर्व विभागांतर्गत उपलब्ध कपातीचा लाभ घेतला आहे.
नियमांनुसार, सामान्यत: उपलब्ध कपातींमध्ये कलम 80 सी अंतर्गत रु. 1.5 लाखांपर्यंत, NPS योगदानासाठी कलम 80CCD (1B) अंतर्गत रु. 50,000 कर लाभ, वैद्यकीय विमा प्रीमियमवर रु. 50,000 कर लाभ इ.
5. पोस्ट ऑफिसमध्ये खाते
जर तुमचे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी Public Provident Fund (PPF), राष्ट्रीय पेन्शन योजना National Pension System (NPS) आणि सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Yojana (SSY) मध्ये खाते असेल आणि तुम्ही चालू आर्थिक वर्षासाठी या खात्यांमध्ये एकही पैसा जमा केला नसेल, तर तुम्ही किमान आवश्यक रक्कम 31 मार्च 2022 पर्यंत जमा करावी.
अन्यथा, पुन्हा सक्रिय करण्यासाठी दंड भरावा लागेल.
लक्षात घ्या की 2021 – 22 या आर्थिक वर्षापासून, एखादी व्यक्ती जुन्या किंवा विद्यमान कर प्रणालीची निवड करू शकते.
विद्यमान कर सवलत आणि कपातीचा लाभ घेऊ शकता.
तुम्ही नवीन कर प्रणालीची निवड केली असली तरीही, खाते सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक असलेले किमान योगदान जमा केले आहे का,
याची खात्री करणे आवश्यक आहे.
Web Title :- Financial Deadlines Before 31 March | financial deadlines before march 31 2022 complete these 5 works in any case otherwise there will be trouble
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update