जेजुरीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – ( संदीप झगडे ) : जेजुरी नगररिषद राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था हडपसर मांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत महिलांना बँकिंग, आर्थिक साक्षरता, स्वयंरोजगार उद्योजकता विकास इत्यादी विषयांवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पूनम कदम यांनी दिली.
या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन नगराध्यक्षा वीणा सोनवणे सभापती रुक्मिणी जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा सोनवणे यांनी या प्रशिक्षणाचा उपयोग महिलांनी स्वयंरोजगाराच्या वाढीसाठी करावा, असे सांगितले.

या प्रसंगी महाबँक ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे पुणे जिल्हा समन्वयक बी. व्ही. तोंडरे व तिरंदाज सर उपस्थित होते. जिल्हा समन्वयक यांनी महाबँक ग्रामीण प्रशिक्षण संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणाची माहिती या वेळी देण्यात आली. प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प अधिकारी बाळासाहेब बगाडे व समुदाय संघटक अमर रणनवरे यांनी केले.

Visit : Policenama.com