आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनला आर्थिक मदत

शिक्रापुर : प्रतिनिधी –   पुणे येथील चार्मस् ग्रुप या संस्थेच्या वतीने शिरुर येथील आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशन या विशेष मुलांच्या संस्थेस वर्धापनदिनानिमित्त एक लक्ष रुपयांची आर्थिक मदत करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

पुणे येथील चार्मस् ग्रुप या संस्थेच्या दरवर्षी राज्यातील विविध सामाजिक क्षेञात उल्लेखनिय कार्य करणा-या संस्थांना विविध स्वरुपात मदत केली जाते.गेली चार वर्षे शिरुर शहर व परिसरात विशेष(दिव्यांग) मुलांसाठी आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशन ही संस्था काम करत आहे.या संस्थेच्या सामाजिक कार्याला हातभार लागावा या हेतुने चार्मस् ग्रुप च्या वतीने प्रा.शशिकांत सोणवणे,रमेश आगवणे यांच्या हस्ते आकांक्षा या संस्थेस एक लक्ष रुपयांचा सामाजिक कृतज्ञता निधी देण्यात आला.यावेळी अत्यंत साध्या पद्धतीने संस्थेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.यावेळी आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या संस्थापिका राणीताई चोरे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा विशद करत खडतर प्रवास मांडला.यावेळी चार्मस् ग्रुपचे लक्ष्मीकांत पाचारणे यांनी बोलताना सांगितले कि, सामाजिक बांधिलकीतुन आजपर्यंत समाजातील विविध क्षेञात उल्लेखनिय काम करणा-या राज्यभरातील १६ संस्थांना मदत करण्यात आली आहे.या पुढील काळात संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पोमण यांनी केले.तर राजेंद्र ढवळे यांनी आभार मानले.

याप्रसंगी रामलिंगचे माजी सरपंच विठ्ठल घावटे, आकांक्षा संस्थेचे सचिव ज्ञानेश घोडे,संस्थेचे सदस्य गणेश सातव, सतीश केदारी चार्मस् ग्रुपचे कुमार शिंदे,गणेश गायकवाड,राजु ननवरे तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.