एन्काऊंटरमध्ये ‘गारद’ झालेल्या ‘विकास’चा मुलगा परदेशात घेतोय MBBS च शिक्षण, जाणून घ्या दुबेच्या कुटुंबाची ‘कुंडली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबेला गुरुवारी मध्य प्रदेशात पोलिसांनी अटक केली. गेल्या सहा दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. दुबे प्रकरणात पोलिसांनी त्याचे कुटुंबिय आणि मित्रांची कसून चौकशी सुरु केली होती. विकासच्या कुटुंबियांची फारशी माहिती कोणालाही माहित नव्हती. मात्र, गेल्या सहा दिवसांत पत्रकारंनी दुबेच्या राहण्याचे ठिकाण चौबेपुर, कानपूर आणि लखनऊ येथून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. यातून दुबे आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर गडगंज संपत्ती असल्याचे समोर आलं .

विकास दुबेचे वडील रामकुमार दुबे यांनी पोलिसांना खोटी माहिती दिली होती. रक्तपाताच्या दिवशी विकास गावात नसल्याचे म्हटले होतं. त्यांनी पोलिसांची दिशाभूल केली. विकासची आई सरला देवी दुबे यांनी मुलाला गेल्या काही महिन्यांपासून पाहिलं नसल्याचे म्हटलं आहे. सरला देवी त्यांचा दुसरा मुलगा दिपू दुबे आणि सून अंजली याच्यासोबत राहतात. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपू दुबे हा भाऊ विकासला रिअल इस्टेटच्या व्यवसायात मदत करत होता. विकासला आणखी एक अविनाश नावाचा लहान भाऊ होता, त्याचा काही दिवसांपूर्वी संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आला होता.

विकास दुबेची पत्नि रिचा त्याच्यासोबत राहायची. शिवाय ती रजाकारणात देखील आहे. रिचा विकास दुबेच्या मित्राची बहिण असून त्यांनी 25 वर्षापूर्वी लग्न केले होते. त्यांना आकाश आणि शानू नावाची दोन मुलं आहेत. मोठा मुलगा आकाश हा परदेशात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. तर लहान मुलगा शानू लखनौमधील एका कॉलेजमध्ये शिकत आहे. तो आपल्या आईसोबत लखनौमध्ये राहतो. विकासची आजीही त्यांच्यासोबत राहते.

विकासला तीन बहिणी असून त्यातील दोन बहिणींचा लग्नानंतर मृत्यू झाला आहे. चंद्रकांता दुबे ही त्याची एकमेव बहीण शिवली येथे तिच्या पतीसोबत राहते. विकास दुबे फरार झाल्यानंतर पोलिसांनी तिची आणि तिच्या पतीची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान तिने आपले आणि विकासचे संपत्तीवरून वाद असून गेल्या काही वर्षापासून त्याला भेटलो नसल्याचे सांगितले.