2 भाषेत स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्ती कशा असतात व त्यांच्या जीवनात नेमक्या कोणत्या अडचणी येऊ शकतात ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – काही लोक (creativity) वेगळेपणा म्हणून दोन भाषेत सही करतात. आज आपण जाणून घेऊयात अशा लोकांचा स्वभाव कसा असतो आणि त्यांच्या जीवनात काय अडचणी येतात. आता दोन भाषेची सही म्हणजे काय. उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीचे नाव मोहित आहे आणि तो ‘मो’ मराठीत/ हिंदीत लिहीत असेल आणि (‘hit’) इंग्रजीमध्ये (मोहीत:-मोhit) लिहीत असेल अशा सहीला दोन भाषेत केली जाणारी सही म्हणतात.

दोन भाषेत सही करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात प्रामुख्याने पाच अडचणी तर दिसूनच येतातच, शिवाय जीवनभर खूप जास्त अडचणींना तोंड द्यावे लागते.

1) अशी व्यक्ती जीवनभर नेहमी कायद्याच्या अडचणीत अडकून राहते.

2) अशी सही करणाऱ्या लोकांचे खूप जास्त मित्र असतील, पण सगळेच्या सगळे धोकेबाज असतात.

3) अशी व्यक्ती कोणत्याही व्यवसायामध्ये यशस्वी होत नाही. भागीदारीमध्येसुद्धा अशा लोकांना धोका मिळतो.

4) अशा व्यक्तींना आर्थिक अडचणींना सतत तोंड द्यावं लागतं. बँकेत असणाऱ्या अकांउंटमध्ये सतत उलाढाल होत असते; परंतु त्यामुळे आर्थिक गरजा पूर्णपणे भागणार नाहीत.

5) अशा व्यक्तीत सर्वांत मोठी कमी अशी असते की, या व्यक्ती सतत आपले काम बदलत असतात. त्यांच्यात कामाविषयी एकाग्रता नसते, म्हणजेच त्यांचं ध्येयसुद्धा सतत बदलत असते.

अशा व्यक्तींमध्ये एक चांगला गुणपण असतो, तो म्हणजे ही लोकं हार मानत नाहीत. सतत पडतात, पण पुन्हा उभी राहण्याचा प्रयत्न करतात.

अधिक माहितीसाठी – डॉ. नवनीत मानधनी (86051 12233)

क्रमशः

You might also like