जाणून घ्या ! कोरोनाबाधितांना Vaccine का देत नाही? 2 डोस वेगवेगळया कंपनीचे घेऊ शकतो का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच देशभरात लसीकरणाची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. मात्र, कोरोनाबाधित रुग्णाला लस दिली जात नाही. याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

अमेरिकेच्या CDC नुसार, जर कोणी लसीचा एकही डोस घेतला नसेल आणि तो कोरोना संक्रमित झाला तर लक्षणे दिसल्यानंतर किमान 90 दिवस वाट पाहावी लागेल. तर वायरोलॉजिस्ट डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितले, की यूके डाटानुसार SARS COV2 इंफेक्शनमुळे तयार झालेली अँटिबॉडी 80 टक्के सुरक्षा देते. त्यामुळे संक्रमित झाल्यानंतर लस घेईपर्यंत 6 महिन्यांची प्रतिक्षा करणे योग्य राहिल.

WHO म्हणतंय…

जागतिक आरोग्य संघटना (WHO) नॅच्युरल इंफेक्शनंतर लस घेण्यासाठी 6 महिने थांबले पाहिजे. कोरोनामुळे निर्माण झालेली अँटिबॉडी शरीरात इतके दिवस बनून राहते. कर्नाटकात SARS_COV2 जेनेटिक कंफर्मेशनच्या नोडेल अधिकारी डॉ. वी. रवी यांनी सांगितले की, कोरोना लक्षण दिसल्यानंतर 8 आठवड्यानंतर दुसरा डोस दिला जाऊ शकतो.

DCGI म्हणतंय…

‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (DCGI) सर्वात पहिले कोविशिल्ड पहिला आणि दुसरा डोस घेण्यामध्ये 4-6 आठवड्याचे अंतर तर कोव्हॅक्सिनमध्ये पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घेण्याची परवानगी आहे. काही दिवसांनी कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी 4-8 आठवड्याचे अंतर आणि कोव्हॅक्सिनसाठी 4-6 आठवड्याचे अंतर वाढवण्यात आले. एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने कोविशिल्डच्या दुसरा डोस पहिल्या डोसनंतर 6-8 आठवड्यात घ्यावा असे सांगितलं.

दोन वेगवेगळे डोस घेऊ शकतो का?

दोन विविध लसी घेतल्याचा सध्या कोणताही डेटा उपलब्ध नाही. तर CDC नुसार कोविड 19 च्या डोसमध्ये मिश्रण करू नका. जर तुम्हाला एका लसीचा दुसरा डोस मिळत नसेल तर दोन्ही डोसमधील अंतर वाढवा. पण विविध कंपन्यांचा डोस घेऊ नका. एकाच कंपनीचा डोस घ्या.