…म्हणून नुसरत भारुचा ने केला होता नावात बदल

मुंबई, ता. १७ : पोलीसनामा ऑनलाइन : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते. तर ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने नुसरतने सगळ्यांची मने जिकंली. नुसरतचा ‘सोनू के टीटू की स्वीटी’ अगदी अनपेक्षितरित्या या चित्रपटाने १०८.७१ कोटींची कमाई केली. हा चित्रपट एक सरप्राईज हिट होता. या चित्रपटाने नुसरतला वेगळी ओळख दिली. सगळ्यांना आश्चयार्चा धक्का दिला होता.

अभिनेत्री नुसरतने करिअर शिखरावर नेण्यासाठी नुसरतने काही महिन्यांपूर्वी आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला आहे. आधी इंग्रजीत तिच्या नावाचे स्पेलिंग Nushrat Bharucha असे होते. आता ते बदलून Nushrratt Bharuccha असे झाले आहे. या नव्या स्पेलिंगमध्ये तिने R, Tआणि C या इंग्रजी अक्षरांची भर घातली आहे. याविषयी एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, माझा नशिबावर विश्वास आहे. ज्योतिष शास्त्र, अंकशास्त्र, टॅरो कार्ड सगळ्यांवर माझी प्रगाढ श्रद्धा आहे. ब्रह्मांड आणि याची ऊर्जा यावरही माझा विश्वास आहे.

अलीकडे मी एका अंकशास्त्र विषयात तज्ज्ञ असलेल्या एका व्यक्तीस भेटले. त्यांनी मला माझ्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केल्यास होणा-या लाभांबद्दल सांगितले. या नव्या स्पेलिंगमुळे माझे करिअर आणखी उंचीवर जाईल असा मला पूर्ण विश्वास आहे असे देखील तिने या मुलाखतीत सांगितले होते. नुसरतने खूपच कमी काळात बॉलिवूडमध्ये प्रस्थ निर्माण केले आहे. तिचा फॅन फॉलोव्हर्स प्रचंड आहे.