अभियंत्यांमधील कलाकार शोधून ‘इन्फिनिटी’ अकॅडमी त्याला देतय व्यासपीठ (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार दडलेला असतो. अभियांत्रिकीसारख्या वरवर रुक्ष वाटणाऱ्या अभ्यासातही एखाद्याला व्यंग, विसंगती दिसते. ती विसंगती पकडणे व सर्वांसमोर सादर करणे हे काही येरागबाळ्याचे काम नाही. अशा अभियंते + अभिनेते असणाऱ्या कलाकारांना शोधणे, त्यांना सादरीकरणासाठी व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या पाठीवर शाबासकीचा हात फिरवणे हे कोणीतरी करणे आवश्यक असते. तो मदतीचा हात दिला आहे इन्फिनिटी या सुप्रसिद्ध अकॅडेमीने. इन्फिनिटी ही अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करणारी अकॅडमी आहे.

थ्री इडियट येऊन गेले तरी फोर्थ इडियट शोधण्याचे काम, रणछोडदास चांचड बनून ‘ऑल इज वेल’ म्हणण्याचे काम इन्फिनिटीने हाती घेतले आहे. इन्फिटीच्या स्टेजवर आजवर अनेकांनी आपली कला सादर करत पाठीवरीत प्रेक्षकांच्या शाबासकीची थाप मिळवली आहे. इन्फिनीच्या स्टँडअप शोमधील कलाकारांच्या सादरीकरणाचा सीजन एक युट्युबवर रिलीज करण्यात आला आहे. यानंतर आता इन्फिनिटी अकॅडमीने आपल्या दुसऱ्या सीजनचा ट्रेलर रिलीज केला आहे.

एखाद्या गोष्टीवर विनोद करणे व त्यावर खळखळून हसता येणे हे उमद्या मनोवृत्तीचे लक्षण असते. हसल्यावर ताण कमी होतो व आयुष्य वाढते. असे आयुष्य समृद्ध करणारे व आयुष्य वाढवणारे प्रसंग अनुभवायचे असतील तर सिझन एक युट्युबवर बघायला चुकवू नका.

Visit : Policenama.com